शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

चमकोगिरीला उधाण कारवाई केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 6:00 AM

गणपतीच्या शुभेच्छा, मंत्र्यांच्या आगमनाचे स्वागत, विकासकामांचे भूमिपूजन, वाढदिवसाच्या शुभेच्छा याशिवाय विविध कारणांसाठी बहुतांश नगरसेवकांद्वारा अनधिकृत होर्डिंग लावण्यात धन्यता मानली जाते. या नियमबाह्य कारभाराला चाप लावण्याचे काम महापालिकेच्या बाजार परवाना विभागाचे असताना या विभागाकडे धाडसच नसल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे.

ठळक मुद्देशहर सौंदर्याचे विद्रुपीकरण : महापालिकेचा बाजार परवाना विभाग करतो तरी काय?

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चौकाचौकांत लागलेल्या अनधिकृत होर्डिंग्जमुळे शहराचे विद्रुपीकरण अन् महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. हे होर्डिंग्ज रस्त्यावर पडत असल्याने एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. सणासुदीत व्यावसायिक, निवडणुकांच्या तोंडावर राजकारणी व बाराही महिने पेव फुटलेले कोचिंग क्लासेस यांचे अनधिकृत होर्डिंग्जच्या विळख्यात शहर आहे. महापालिकेच्या बाजार परवाना विभागाद्वारा कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याने दिवसेंदिवस या प्रकारात वाढ होत आहे.गणपतीच्या शुभेच्छा, मंत्र्यांच्या आगमनाचे स्वागत, विकासकामांचे भूमिपूजन, वाढदिवसाच्या शुभेच्छा याशिवाय विविध कारणांसाठी बहुतांश नगरसेवकांद्वारा अनधिकृत होर्डिंग लावण्यात धन्यता मानली जाते. या नियमबाह्य कारभाराला चाप लावण्याचे काम महापालिकेच्या बाजार परवाना विभागाचे असताना या विभागाकडे धाडसच नसल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. त्यामुळे राहणीमानाच्या निर्देशांकात राज्यात टॉप तीनमध्ये असणारे शहर हेच काय, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.या चमकोगिरीसाठी सर्व नियम, कायदे पायदळी तुडविले जात आहे. बाजार परवाना विभागाकडे महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त यांचे असणारे दुर्लक्ष व या विभागात जरब असणारा अधिकारीच नसल्यामुळे या प्रकारात दिवसेंदिवसेन वाढ होत आहे. अत्यंत स्वस्त व सवंग जाहिरातीच्या या प्रकाराला पायबंध घालणार कोण, असा नागरिकांचा सवाल आहे. अगदी थातूरमातूर कारवाई करण्यात धन्यता माननाऱ्या या विभागाची महापालिकेत गरजच काय, अन् नागरिकांच्या भरलेल्या करातून देखाव्यासाठी कशाला हा विभाग ठेवता, असा सवाल अमरावतीकरांचा आहे.लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान आयोगाचे निर्देश आहेत म्हणून ही होर्डिंग्ज काढण्यात आली. त्यानंतर शहराची स्थिती पुन्हा जैसे थै राहणार आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची वाट पाहणार, त्यामुळे उत्पन्नावर घाला घालणाºया या विभागाचे काम तरी कोणते? तसेही महापालिकेने काढले नाही तर निवडणूक यंत्रणेद्वारा अधिकृत अन् अनधिकृत चमकोबाजांची फलके काढणार आहे. त्यामुळे शहर सौंदर्याची वाट लावणाºया या विभागावर आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोणबाजार परवाना विभागाद्वारा अधिकृत होर्डिग्जला परवानगी देताना त्यांच्याच मजकुराची पडताळणी केली जाते. जेथे फलक लावायचा आहे, त्या ठिकाणच्या सर्व संबंधित ‘ना हरकत परवानगी’ मागितली जाते. किती कालावधीसाठी हा फलक राहणार, याचे स्टिकर त्या होर्डिंग्जवर लावले जाते. अन्यथा बाजार परवाना विभागाद्वारा महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध कायद्याचे अधिनियम १९९५ अंतर्गत प्रावधान आहे. यात तीन महिन्यांची शिक्षा व दोन हजारांचा दंड किंवा एकाचवेळी दोन्ही प्रकारच्या शिक्षेची यात तरतूद आहे. मात्र, बाजार परवाना विभागात कारवाई करण्याची हिंमतच नसल्यामुळे या चमकोगिरीच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे.मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे किती प्रमाणात पालन?भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी वैयक्तिक किंवा पक्षाची होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स, डिजिटल फ्लेक्स लावू नयेत, कमानी उभारू नयेत, त्यावर मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांचे छायाचित्र प्रदर्शित करू नयेत, अशा सूचना प्रदेशाध्यक्षांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना पत्राद्वारे मार्च महिन्यात केल्या आहेत. तसेच सूचनेचे सक्तीने पालन करावे, अशी तंबीदेखील सदर पत्रात देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात महापालिकेतील भाजप पदाधिकाºयांचे कित्येक अनधिकृत फलक चौकाचौकांत दृष्टीपथास येत आहेत. त्यामुळे अन्य पक्षीय पदाधिकाºयांकडून काय अपेक्षा करावी, असा नागरिकांचा थेट सवाल आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती