शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कुठलाही ताप असो, रुग्णाची आरटी-पीसीआर आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:13 IST

अमरावती : रुग्णाला टायफाईड किंवा कोणत्याही प्रकारचा ताप आल्यास त्यावरील उपचार करतानाच रुग्णाची दोन दिवसांत आरटी-पीसीआर चाचणी करून घ्यावी. ...

अमरावती : रुग्णाला टायफाईड किंवा कोणत्याही प्रकारचा ताप आल्यास त्यावरील उपचार करतानाच रुग्णाची दोन दिवसांत आरटी-पीसीआर चाचणी करून घ्यावी. जेणेकरून तो कोरोनाबाधित असल्याचे आढळल्यास त्याला वेळीच उपचार मिळू शकेल. अनेकदा उशिरा निदान झाल्याने रुग्ण दगावतात. ग्रामीण भागातील डॉक्टर मंडळींनी ही बाब कसोशीने पाळण्याची सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी सायंकाळी झालेल्या डॉक्टरांच्या बैठकीत मांडण्यात आली.

शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत आरोग्य यंत्रणा, इंडियन मेडिकल असोसिएशन व विविध मान्यवर डॉक्टर मंडळींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी दुपारी झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, डॉ. प्रफुल्ल कडू, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, डॉ. जयश्री नांदुरकर, डॉ. अनिल रोहणकर यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

अनेकदा रुग्णाला ताप आल्यानंतर टायफाईड किंवा इतर प्रकार तापाचे निदान होते. तेवढ्यापुरतेच उपचार केले जातात. मात्र, अशावेळी रुग्ण कोरोनाबाधित असल्यास त्याचा आजार वाढू शकतो. त्यामुळे कुठलीच जोखीम न घेता ताप आला तरी चाचणी करूनच घ्यावी. सध्याचे संक्रमण पाहता प्रत्येक ताप हा कोरोना समजावा, अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे डॉक्टरांनी, विशेषत: ग्रामीण भागातील डॉक्टरांनी ही बाब कसोशीने पाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नवाल यांनी यावेळी केले. केंद्र व राज्य शासनाच्या टास्क फोर्सने याबाबत वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित केले आहे.

बॉक्स

डॉक्टरांनी ताप म्हणजे कोरोना समजावा

यापूर्वी ही साथ शहरी भागात अधिक होती, ती आता दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागातही वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील डॉक्टर बांधवांनी प्रत्येक ताप म्हणजे कोरोना समजावा. सर्वप्रथम त्याला आयसोलेशनचा सल्ला द्यावा व त्यानंतर त्याची आरटीपीसीआर चाचणीही करून घ्यावी. ग्रामीण भागातील जनरल प्रॅक्टिशनरला रुग्णावरील उपचारात ॲजिथ्रोमायसीन, आयवरमॅक्टिन, माँटेल्युकास्ट अशी औषधे वापरता येतील, अशी सूचना डॉ. प्रफुल्ल कडू यांनी केली.

बॉक्स

घरगुती उपचारांवर विसंबून राहणे धोक्याचे

नागरिकांनी हलका ताप असला तरी डॉक्टरांकडून तपासणे व चाचणी करून घेणे आवश्यक आहे. घरगुती उपचारांवर विसंबून राहू नये. या काळात वैद्यकीय तपासणी व योग्य उपचारच घ्यावेत, अशी सूचना डॉ. अनिल रोहणकर यांनी केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत, एक व्यक्ती पॉझिटिव्ह आली तर अख्खे कुटुंबच पॉझिटिव्ह येत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे सर्वांची चाचणी होणे आवश्यक आहे.