सांगा विदर्भासाठी विजेचा रास्त दर कोणता?
By Admin | Updated: August 2, 2015 00:36 IST2015-08-02T00:36:19+5:302015-08-02T00:36:19+5:30
विजेच्या बाबतीत विदर्भाच्या नैसर्गिक संसाधनांचे (जमीन, पाणी, कोळसा) उर्वरित महाराष्ट्रात साठ वर्षांपासून शोषण होत आहे.

सांगा विदर्भासाठी विजेचा रास्त दर कोणता?
अमरावती : विजेच्या बाबतीत विदर्भाच्या नैसर्गिक संसाधनांचे (जमीन, पाणी, कोळसा) उर्वरित महाराष्ट्रात साठ वर्षांपासून शोषण होत आहे. निर्मित विजेपैकी विदर्भाला अगदी कमी हिस्सा दिला गेला. आजही विदर्भाच्या उत्पादनातील एक तृतीयांश हिस्सा विदर्भातील शेती, उद्योग व घरगुती उपयोगासाठी मिळत आहे. मात्र राज्याच्या वीज उपयोगाचा सरासरी खर्च दर युनिट विदर्भाच्या उपभोक्त्यावर लावला जातो. उत्पादनाच्या जोडीने हे खर्च लावल्याने येथील लोकांना वीज महाग पडते. मग विदर्भासाठी विजेची रास्त किंमत कोणती, असा सवाल करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने इर्विन चौकात निदर्शने करण्यात आली.
विदर्भातील उद्योगांना अपुरा पुरवठा व न परवडणारे उच्च दर, विदर्भातील शेतीला १६ तासांचे विद्युत भारनियमन या समस्यांनी विदर्भवासी ग्रासलेले आहे. मात्र विदर्भातील विजेची मागणीच नाही, असे सांगितले. जावून विदर्भाची वीज विदर्भाबाहेर पाठविली जाते, असे निवेदनात नमूद आहे. वीज गळती, वीज चोरी, अती खोल बोअरवेलमधून उपश्याचे उंच प्रदेशात पंपींग करून पाणी चढविण्याचे राज्यभऱ्यातील खर्च, आवश्यक खर्च आहे असे मानून त्याचा सरासरी खर्च दर युनिट खर्च विदर्भाच्या उपभोक्त्यावर मानल्या जात असल्याने विदर्भातील वीज महाग पडते त्यामुळे विदर्भासाठी रास्त दर कोणता? असा सवाल निवेदनात करण्यात आला आहे.
या आंदोलनात वेगळ्या विदर्भाची शपथ घेण्यात येवून वीज बिलाची होळी करण्यात आली. यावेळी जगदिश नाना बोंडे, राजेंद्र आगरकर, रंजना मामर्डे, पुरूषोत्तम बनसोड, श्रीकांत पाटील, अशोक वानखडे, सुभाष धोटे, पी. पी. लोणारे, प्रकाश शिरभाते, राजाभाऊ तायवाडे, ज्ञानेश्वर गादे आदी उपस्थित होते.