भग्न कुंड्यांमुळे कसले सौंदर्यीकरण ?
By Admin | Updated: December 25, 2015 01:04 IST2015-12-25T01:04:17+5:302015-12-25T01:04:17+5:30
अंबानगरीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. परंतु अमरावती शहराचे सौंदर्य येथील फुटलेल्या दुभाजकांवरील कुंड्या लक्ष वेधून घेत आहेत.

भग्न कुंड्यांमुळे कसले सौंदर्यीकरण ?
अमरावती : अंबानगरीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. परंतु अमरावती शहराचे सौंदर्य येथील फुटलेल्या दुभाजकांवरील कुंड्या लक्ष वेधून घेत आहेत. व्हीव्हीआयपी व नेते अमरावती शहरात दाखल होताच या कूचकामी झालेल्या कुंड्या आढळतात. महानगरपालिका या कुंड्यांची विल्हेवाट केव्हा लावता, असा प्रश्न अमरावतीकरांना पडला.
एकात्मिक रस्ते विकास महामंडळाने चार वर्षापूर्वी जेव्हा डिवायडर तयार केले तेव्हा. शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी म्हणून लाखों रुपये खर्च करून या कुंड्या लावण्यात आल्या होत्या.
शहरातील पंचवटी चौक ते इर्विन चौक, कॅम्प चौक, रेलवे स्टेशन चौक, बस स्टॅँड चौकात दुभाजकांवर कुंड्या आहेत. यामध्ये झाडे लावली होती. काही रास्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येतात. काही रास्ते हे महापालिकेअंतर्गत येतात. पण शहर सौंदर्यीकरण व या कुंड्याच्या व्यवस्थापनात सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिका अपयशी ठरली आहे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा शहरात दौरा लागला होता. ज्या-ज्या मार्गावरुन मुख्यमंत्र्यांचा ताफा धावणार होता त्या कुंड्या खराब दिसतात. फोडण्याचा कोविलवाणा प्रताप केला होता.'लोकमत'ने यासंदर्भाचे वृत्त प्रकाशित करताच सार्वजनिक बांधकाम विभागाची तारांबळ उडाली होती. (प्रतिनिधी)