शाब्बास ! भंगार विक्रेत्याचा मुलगा झाला कर सहायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 05:55 PM2020-07-22T17:55:11+5:302020-07-22T17:59:09+5:30

भंगार विक्रेत्याचा मुलगा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या कर सहायक या पदाच्या परीक्षेत खुल्या संवगार्तून राज्यातून अव्वल

Well done! The son of a scrap dealer became a tax assistant | शाब्बास ! भंगार विक्रेत्याचा मुलगा झाला कर सहायक

शाब्बास ! भंगार विक्रेत्याचा मुलगा झाला कर सहायक

googlenewsNext
ठळक मुद्देएमपीएससीतून राज्यात अव्वल दर्यापूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा

सचिन मानकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: येथील भंगार विक्रेत्याचा मुलगा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या कर सहायक या पदाच्या परीक्षेत खुल्या संवगार्तून राज्यातून अव्वल आला आहे . अपार कष्ट, जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या बळावर मो. शाहीद मो. अयुब (२७) याने ही किमया केली. दर्यापूर तालुक्याच्या शिरपेचात त्याने आपल्या यशाने मानाचा तुरा खोवला.
सन २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या कर सहायकपदाच्या परीक्षेचा ऱ्यांनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. राज्यात मो. शाहीद अव्वल आल्याचे कळताच दर्यापुरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. शहरातील राठीपुरानजीक राहणाऱ्या मोहम्मद शाहीद याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून २०१६ मध्ये बी.ए. पदवी संपादन केली. प्राध्यापक गजानन कोरे यांच्या मार्गदर्शनात २०१३ पासून त्याने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. २०१७ मध्ये तो पोस्टाची परीक्षा उत्तीर्ण झाला. २०१९ मध्ये पुन्हा एसटी महामंडळाची परीक्षा दिली. त्यामध्ये तो सुरक्षा निरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याची आर्डर घरी आली असतानाच कर सहायकपदाच्या परीक्षेत राज्यातून अव्वल आल्याची वार्ता धडकली. येथेच न थांबता उपजिल्हाधिकारी पद मिळवायचे असल्याची मनीषा त्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केली. यादरम्यान मंत्रालय सहायक म्हणूनसुद्धा संधी मिळाली असल्याचे त्याने सांगितले.
अन्य एका भावाचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्याला वडील हातभार लावतात. यादरम्यान त्याच्या यशाचे कौतुक करण्यासाठी बुधवारी त्याच्या घरी दिवसभर नेतेमंडळी व आप्तांचा राबता होता.

मी ज्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात विद्यार्थी होतो, तेथेच मी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांनाही शिकविले. माझ्या यशात मोठा भाऊ रेहान व गजानन कोरे यांचा सिंहाचा वाटा आहे. पुढे उपजिल्हाधिकारी व्हायचे आहे.
- मोहम्मद शाहीद, दर्यापूर

मोहम्मदचा मोठा भाऊ शासकीय नोकरीत लागल्याने त्याच्याकडूनच त्याने प्रेरणा घेऊन स्पर्धा परीक्षेच्या क्लासमध्ये आला. त्यानंतर त्याने जिद्दीने व मेहनतीने हे यश संपादन केले.
- गजानन कोरे, प्राध्यापक, दर्यापूर

 

 

Web Title: Well done! The son of a scrap dealer became a tax assistant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.