विदर्भ गर्जना यात्रेचे वरूडात स्वागत
By Admin | Updated: March 2, 2015 00:33 IST2015-03-02T00:33:49+5:302015-03-02T00:33:49+5:30
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने विदर्भ गर्जना यात्रा नुकतीच काढण्यात आली असून ही यात्रा रविवारी तालुक्यात पोहचली.

विदर्भ गर्जना यात्रेचे वरूडात स्वागत
वरुड : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने विदर्भ गर्जना यात्रा नुकतीच काढण्यात आली असून ही यात्रा रविवारी तालुक्यात पोहचली. यावेळी स्वतंत्र विदर्भ राज्य चळवळीला शक्तीशाली बनविण्याचे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वामनराव चटप यांनी केले.
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी लढा अनेक वर्षांपासून सुरु आहे. अनेकांनी रणशिंग फुंकले प्रवाहासोबत वाहून जाणारे अनेक होते. परंतु जुने विदर्भवादी आजही आपल्या शब्दावर ठाम आहेत. येणारे नवीन चेहरे मात्र वाट मिळेल तिकडे गेलेत. निवडणूक काळात उमेदवारांनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरून मते मिळवली. परंतु दिलेले आश्वासन फोल ठरताना दिसत आहे. त्यामुळे विदर्भातील जनतेला जाग आणण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने विदर्भ गर्जना यात्रा काढण्यात आली. याची सुुरूवात गांधी पुतळा, व्हेरायटी चौैैक, नागपूर व समारोप मेळावा गडचिरोली येथे होणार आहे. जवळपास २ हजार १०० कि. मी. अंतराची ही यात्रा आहे. ती यात्रा वरुड तालुक्यात आली. यावेळी तालुक्यातील बेनोडा, जरूड त्यानंतर स्थानिक महात्मा फुले चौैैकात सभा घेण्यात आली. स्वतंत्र विदर्भ राज्य चळवळीला शक्तीशाली बनविण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी माजी आमदार वामनराव चटप बोलताना म्हणाले की, नागपूर करार अंतर्गत १९५६ मध्ये विदर्भप्रांत महाराष्ट्रात सामील झाला. त्यानंतर विदर्भावर अन्याय वाढतच गेला. नागपूर कराराचे पालन राज्यसरकारने केले नाही. त्यामुळे सिंचन उद्योगधंदे रोजगार, प्रादेशिक विकास इत्यादी बाबींचा बॅकलॉग सतत वाढतच गेला. परीणामत: शेती, पाणी, कोळसा, कापुस, वीज, मॅग्नीज, वनसंपत्ती सर्व प्रकारचा कच्चा माल व उद्योग धंदे, नोकऱ्या, विकास सर्वप्रकारे पश्चिम महाराष्ट्रत असे चित्र उभे झाले आहे. आमच्या वाटेला काय तर मागासलेपणा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण प्रदूषणामुळे कर्करोग, दमा यासारखे दुर्धर रोग, नक्षलवाद यांनी आपण ग्रस्त व त्रस्त आहोत. या सर्व बाबीतून बाहेर पडायचे असेल तर यावर एकच उपाय स्वतंत्र विदर्भ राज्य यासाठी 'विदर्भ मिळवू औैैैंदा' या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार वामनराव चटप, संजय कोल्हे, दिलीप भोयर, प्रमोद कुटे, दिलीप यावलकर, शिवहरी सावरकर, दिलीप लव्हाळे, बाबाराव माकोडे, विनायक देशमुख, रघुनाथ खुजे, धनपालसिंग चंदेल, विनय फरकाडे, देवेंद्र गोरडे, साहेबराव पाटील, बाबाराव तडस, प्रकाश ठाकरे, रामरावजी वानखडे, ज्ञानेश्वर निकाजु, रामचंद्र पाटील, सुनील पावडे, अनिल वानखडे, अण्णासाहेब घोरमाडे, गजानन उपासे, पुरूषोत्तम वानखडे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)