रहदारीच्या रस्त्यावर आठवडी बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:29 IST2020-12-13T04:29:15+5:302020-12-13T04:29:15+5:30
पथ्रोट : शुक्रवारी भरणाऱ्या गावातील आठवडी बाजारात काही व्यापारी आपली दुकाने रहदारीच्या रस्त्यावर थाटतात. त्यामुळे बाजाराकरिता आलेल्या ग्राहकांची एकच ...

रहदारीच्या रस्त्यावर आठवडी बाजार
पथ्रोट : शुक्रवारी भरणाऱ्या गावातील आठवडी बाजारात काही व्यापारी आपली दुकाने रहदारीच्या रस्त्यावर थाटतात. त्यामुळे बाजाराकरिता आलेल्या ग्राहकांची एकच गर्दी होत असल्याने वाहतुकीला अडथळा होतो. याबाबत गावकऱ्यांनी अनेकदा ग्रामपंचायतकडे तक्रारी मांडल्या. त्यांची दखल घेऊन ग्रामविस्तार अधिकारी हर्षदा बोंडे यांनी दुकानदारांना समज दिला व सामंजस्याने प्रश्न निकाली काढून रहदारीचा रस्ता मोकळा झाला.
अचलपूर तालुक्यात पथ्रोट हे गाव लोकसंख्येच्या मानाने मोठे आहे. कासमपूर, रामापूर, जवळापूर, शिंदी बू. पांढरी खानमपूर, गोंडवाघोली, कुणभी वाघोली, वागडोह, शाहनूर, येथील नागरिक शुक्रवारी आठवड्यातून एकदा भरणाऱ्या आठवडी बाजारात बाजारहाट करण्यासाठी येत असल्याने येथे एकच गर्दी होते, त्यातच बाहेरगावावरून येणारे व्यापारी आठवडी बाजारात ग्रामपंचायतीने बांधलेल्या ओट्यावर दूकाने न थाटता. रहदारीच्या रस्त्यावर व्यवसायासाठी जागा घेत होते. त्यामुळे पादचारी, दुचाकी, जड वाहणे, शेतातून येणारी जनावरे, बैलबंड्या, विद्यार्थी यांना अडथळा होत होता. कित्येकदा येेथे अपघात घडले. रस्ता मोकळा करण्याबाबत अनेक तक्रारी, विनंती अर्ज ग्रामपंचायतला दाखल होत्या.
कोट
रस्ता व्यापणाऱ्या विक्रेत्यांना समज दिला. पुढील आठवड्यापासून ओट्यावर व्यवसाय करण्याचे आवश्वासन त्यांनी दिले. बाजारहाट करण्याकरिता येणाऱ्या ग्राहकांना त्रास होऊ नये व भर रस्त्यावर दुकानदानांनी आपली दुकाने थाटू नये. याकरीता दुकानदारांना समजावून प्रश्न निकाली काढला.
-हर्षदा बोंडे, ग्रामविकास अधिकारी, पथ्रोट