शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

९० टक्के थकबाकीदारांच्या भागात पाणीपुरवठा होणार बंद!

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 3, 2024 22:17 IST

२१४ कोटींची थकबाकी, मजीप्राची योजनाच धोक्यात : उत्पन्न अन् खर्चात नऊ कोटींची तफावत

अमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजनेद्वारे महानगराला पाणीपुरवठा केला जातो; मात्र थकबाकी २१४ कोटींवर गेल्याने योजनेची देखभाल दुरुस्ती करणे कठीण झाले आहे. उत्पन्न व त्यासाठी होणारा खर्च यामध्ये ९ कोटींची तफावत असल्याने योजनाच धोक्यात आलेली आहे. त्यामुळे ९० टक्के थकबाकीदार ग्राहक असलेल्या भागाचा पाणीपुरवठा खंडित करण्याचे कठोर पाऊल मजीप्राद्वारा घेण्यात आलेले आहे. यामध्ये बिलाचा भरणा करणाऱ्या १० टक्के नागरिकांना टँकरद्वारा पाणीपुरवठा करण्यात येईल. 

महानगरात १,००,६७३ नळजोडण्या दिलेल्या आहेत. यापैकी फक्त ३५ टक्के ग्राहकच नियमित पाणीपट्टीचा भरणा करतात. त्यामुळे योजनेवरील खर्च व पाणीपट्टीद्वारे उत्पन्न यामधील तफावत वाढत आहे. सद्य:स्थितीत नऊ कोटींचा घाटा सहन करून महानगराची योजना सुरू आहे; मात्र ही तफावत वाढत असल्याने घाट्यातील योजना चालविणे मजीप्रासाठी कठीण बाब होणार आहे. विजेचे देयक न भरले गेल्याने महावितरणद्वारा एका लाखाचा दंड मजीप्राला ठोठावला आहे. कंत्राटदारांची देयके आठ महिन्यांपासून प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत योजना बंद पडल्यास महानगराचा पाणीपुरवठा कोणत्याही क्षणी बंद होण्याची शक्यता आहे.

या भागाचा पाणीपुरवठा करणार बंद९० टक्के थकबाकी असलेल्या भागाचा पाणीपुरवठा मजीप्राद्वारा खंडित करण्यात येणार आहे. यामध्ये वडाळी, मसानगंज, यास्मिननगर, गुलिस्तानगर, रहेमतनगर, ताजनगर व बडनेरा शहरातील माताफैल, स्वीपर कॉलनी, पाच बंगला, अलमासनगर, चमननगर, मोतीनगर व संलग्न भागाचा समावेश आहे. यामध्ये १० टक्के नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.  

योजनेचे वीज देयक महिन्याला दीड कोटीयोजनेचे वीज देयक महिन्याला दीड कोटींचे आहे. धरणातील अशुद्ध पाण्याची उचल करण्यासाठी २५ लाख, पाणी शुद्धीकरणाचे रसायनकरिता ४.२६ लाख, व्हॅालमनचे वेतन, गळत्या दुरुस्ती, पंपिंग मशीनरी यासाठी ६० लाख, यासोबत इतर अनुषंगीत खर्चासाठी तीन कोटी असा खर्च होत आहे. शिवाय आठ अभियंते व २१२ कुशल, अकुशल कामगारांचाही खर्चाचा भार पाणीपट्टीतून केला जातो.

अमृत-२ साठी २९६ कोटी कसे उभारणार?अमृत-२ योजनेच्या ९८५.४९ कोटींच्या कामांना राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे. त्यापैकी २९५.६४ कोटी रुपये मजीप्राला उभारायचे आहे. या रकमेची पूर्तता पाणीपट्टीमधून वसूल करण्याची हमी मजीप्राने घेतलेली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाणीपट्टीचा भरणा करून शहराच्या पाणीपुरवठा योजनेप्रती मजीप्राला सहकार्य करणे महत्त्वाचे आहे.

शहरातील ग्राहकांकडे २१४ कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे पाणीपट्टीद्वारे उत्पन्न व योजनेचा खर्च यामध्ये नऊ कोटींचा सध्या घाटा आहे. त्यामुळे ९० टक्के थकबाकीदार ग्राहक असलेल्या भागाचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.- संजय लेवरकर, उपअभियंता मजीप्रा.

टॅग्स :Waterपाणी