पाणीपुरवठा करणारे टँकर पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:53 IST2019-03-26T22:52:52+5:302019-03-26T22:53:13+5:30

एक महिन्यापासून चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई असताना अधिग्रहित केलेल्या विहिरींतून आदिवासींपर्यंत पाणीपुरवठा करणारे टँकरच निवडणुकीसह इतर तालुक्यांतील कामांसाठी पळविले. परिणामी मेळघाटात एकही टँँकर सुरू झाला नसल्याचे वास्तव आहे. पाण्यासाठी वणवण सुरू असताना प्रशासनाकडून प्रस्ताव मंजुरीचा खेळ होत असल्याचा संताप आदिवासींमध्ये आहे.

The water supply tankers were thrown out | पाणीपुरवठा करणारे टँकर पळविले

पाणीपुरवठा करणारे टँकर पळविले

ठळक मुद्देशासन झोपेत : दीड महिन्यांपासून आदिवासींची पाण्यासाठी भटकंती

नरेंद्र जावरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : एक महिन्यापासून चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई असताना अधिग्रहित केलेल्या विहिरींतून आदिवासींपर्यंत पाणीपुरवठा करणारे टँकरच निवडणुकीसह इतर तालुक्यांतील कामांसाठी पळविले. परिणामी मेळघाटात एकही टँँकर सुरू झाला नसल्याचे वास्तव आहे. पाण्यासाठी वणवण सुरू असताना प्रशासनाकडून प्रस्ताव मंजुरीचा खेळ होत असल्याचा संताप आदिवासींमध्ये आहे.
उन्हाळा लागताच चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यांंना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. नऊ गावात टँकरने पुरवठा करण्याचे प्रस्ताव धारणी येथे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले होते. त्यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्यास मान्यता दिली. परंतु, टँकरच नसल्याने आदिवासींपर्यंत पिण्याचे पाणी पोहोचलेले नाही.
आदिवासी तहानलेलेच
चिखलदरा तालुक्यात पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदचे चार, अचलपूर व दयार्पूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रत्येकी दोन असे आठ टँकर प्रस्तावित करण्यात आले होते. त्यातील एक टँकर चांदूर रेल्वे येथे पाठविण्यात आला. दुसरा टँकर अंजनगाव तालुक्यातील चिंचोना येथे पाठविण्यात आला आहे. दोन टँकर निवडणूक कामानिमित्त ठेवण्यात आले असून, जिल्हा परिषदेचे टँकर नेमके कोठे गेले, याची अजूनपर्यंत माहिती मिळालेली नाही.
जिल्हा प्रशासन केवळ पाणीटंचाईच्या बैठका कागदावरच घेऊन वेळ मारून नेत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे पहाटे ४ वाजतापासून आदिवासींची दऱ्याखोºयातून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.
१७ गावात भीषण टंचाई
तालुक्यातील पिपादरी, सोमवारखेडा, धरमडोह, बहाद्दरपूर, भिलखेडा, सोनापूर, कोयलारी, पाचडोंगरी आणि मनभंग या नऊ गावांमध्ये पहिल्या टप्प्यात टँकरने तात्काळ पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावास धारणी उपविभागीय अधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दिली. मलकापूर, खिरपाणी, कोरडा, कालापांढरी, हतरू, घाणा, खंडुखेडा येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी काही गावांतील विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. परंतु, टँकरच नसल्याने आदिवासींची पायपीट सुरू आहे. दुसरीकडे हातपंप नादुरुस्त व पाण्याची पातळी खोलवर गेल्याने विहिरीसुद्धा कोरड्या पडू लागल्या आहेत.

टँकरचे प्रस्ताव मंजूर होऊन आले असले तरी अजूनपर्यंत तालुक्यात एकही टँकर आलेला नाही. यासंदर्भात वरिष्ठांकडे पत्रव्यवहार सुरू आहे.
- नरेंद्र ठाकरे, कनिष्ठ सहायक, पाणीपुरवठा विभाग
पं. स. चिखलदरा

निवडणूक महत्त्वाचीच, मात्र आदिवासींचा जीवसुद्धा मोलाचा आहे. मेळघाटवासी महिनाभारापासून पाणीटंचाईस सामोरे जात असताना प्रशासनाची लेटलतिफी संतापजनक आहे.
- सुनंदा काकड
जिल्हा परिषद सदस्य

Web Title: The water supply tankers were thrown out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.