शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याला फडणवीस,अजित पवारांचा विरोध होता"
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

पाणी लबालब, पुरवठा दिवसाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 1:05 AM

अमरावतीकरांना तहान भागविण्यासाठी पाणी आहे; मात्र ते एक दिवसाआड करून कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा सर्वाधिक परिणाम अमरावतीकरांच्या दैनंदिन नियोजनावर झालेला आहे. याशिवाय साठवणुकीची साधने, नळाची प्रतीक्षा व अतिरिक्त पाण्याचे काय करायचे, हे मुद्दे पुढे येत आहेत.

ठळक मुद्देअमरावतीकरांच्या दिनचर्येवर प्रभाव : पाणी वितरणाचे नियोजन बिघडले, बोअरवेलचा सपाटा

वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावतीकरांना तहान भागविण्यासाठी पाणी आहे; मात्र ते एक दिवसाआड करून कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा सर्वाधिक परिणाम अमरावतीकरांच्या दैनंदिन नियोजनावर झालेला आहे. याशिवाय साठवणुकीची साधने, नळाची प्रतीक्षा व अतिरिक्त पाण्याचे काय करायचे, हे मुद्दे पुढे येत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणी वितरणाची प्रणाली सदोष असल्यामुळे अमरावतीकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मजीप्राच्या पाण्यावर तहान भागविणाऱ्या अमरावतीकरांवर मुबलक पुरवठा होत नसल्यामुळे आता बोअरवेलची वेळ आली. त्यामुळे शहरात बोअरवेलचा सपाटा सुरू झाला आहे. भर उन्हाळ्यात शहरातील पाणीपातळीसुद्धा खालावली आहे. त्यामुळे वापराच्या पाण्याची धुराही मजीप्राच्या पाण्यावर आली आहे. त्यातच मजीप्राच्या नळाची वेळ अनिश्चित असल्यामुळे अक्षरश: अमरावतीकरांची दिनचर्याच बिघडली आहे. कामकरी पुरुषांनीही आता पाणी भरण्यासाठी गुंतावे लागत आहे. त्यामुळे अमरावतीकर पाणी संकटामुळे मानसिक तणावातसुद्धा आल्याचे दिसत आहे. एकीकडे ‘पाणी वाचवा’चा संदेश मजीप्रा देते, तर दुसरीकडे पाणी नासाडीकडे दुर्लक्ष चालविले आहे. अनेक घरी पाहुण्यांना पाणी जपून वापरा, असे सल्ले दिले जात आहेत. पाणी मुबलक; मात्र नियोजन नाही, कोणाला अधिक, तर कुणाला थेंबभरही मिळत नसल्याचे चित्र अमरावती शहरात आहे. मजीप्राची सदोष वितरण प्रणालीने निर्माण केलेल्या पाणीटंचाईमुळे अमरावतीकरांच्या जीवनप्रवाहावर मोठा परिणाम झाला आहे.नळांना तोट्याच नसल्याने पाणी नासाडीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून विविध परिसरातील सार्वजनिक नळांना पाणीपुरवठा केला जातो. या सार्वजनिक नळांची देयके भरण्याची जबाबदारी महापालिकेकडे आहे. बहुतांश सार्वजनिक नळांना तोट्या नसल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. नळातील पाणी अक्षरश: नाल्यांमधून वाहते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महापालिकेने काही नळ बंद करण्यास मजीप्राला सांगितले. मात्र, नागरिकांचा रोष कोण पत्करणार, याचीच भीती अधिकाऱ्यांना आहे.१० टक्के पाणी चोरीलामहाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीचोरांवर लक्ष ठेवून असल्याचे सांगते. मात्र, पाणीचोरीला अंकुश घालण्यात मजीप्रा सपशेल अपयशी ठरली आहे. मजीप्रा अधिकाºयांच्या सांगण्यानुसार, शहरात १० टक्के पाणी चोरीला जाते. मात्र, पाणी चोरीचा टक्केवारी अधिकच आहे. एकीकडे पाण्याचे पैसे भरूनही पाणी मिळत नाही, तर दुसरी पाणी चोर फुकटातच पाणी मिळवत आहे.लोकप्रतिनिधींचे कर्तव्य काहीच नाही का?शहरातील पाणीटंचाईकडे लक्ष देणे ही जबाबदारी लोकप्रतिनिधी आहे. मात्र, एकही लोकप्रतिनिधीच्या गावी पाणीटंचाई ही समस्याच नसावी. मजीप्राने नियोजनबद्ध वाटप केल्यास पाणी समस्या चुटकीसरशी दूर होईल. त्यासाठी लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा आवश्यक आहे.नळ येण्याची वेळ पाहून न्हाणोरालग्नसराईचा मोसम शहरात असताना, वधु-वर पक्षालाही नळाच्या पाण्याची चिंता पडलेली आहे. दीड दिवसांनी नळ येत असल्यामुळे, त्यानुसार न्हाणोºयाचा दिवस निश्चित केला जात आहे. असाच एक प्रकार कठोरा नाका परिसरात पुढे आला. एका कुटुंबातील लग्न सोहळ्यात न्हाणोरा करण्यासाठी नळ येण्याची दिवस निश्चित केला गेला.उन्हाळ्यात बोअर व विहिरी आटत असल्यामुळे वापरासाठी पाण्याची मागणी वाढली आहे. नवे जलशुद्धीकरण केंद्र झाल्यानंतर पाणी समस्या राहणार नाही.- किशोर सूर्यवंशी, उपविभागीय अभियंता, मजीप्रा.उन्हाळ्यामुळे कूलरला अधिक पाणी लागते. नळाचे पाणी पुरत नाही. त्यामुळे पाणीटंचाई भासत आहे. मजीप्रा केव्हा देणार २४ तास पाणी?- सुनिता धंदर,अर्जुननगर,दीड दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे लग्नातील पाहुण्यांसाठी पाणी पुरत नाही. न्हाणोराचे आयोजन नळ येण्याच्या दिवसावर करण्याची विचित्र स्थिती आमच्यावर आली.- उषा अविनाश बोकेन्यू स्वस्तिक नगर.दररोज पाणी मिळत नसल्यामुळे चणचण भासते. साठवणुकीसाठी साहित्य नाही, हे महत्त्वाचे. अधिक पाणी साठविल्यास ते दुसºया दिवशी पिण्यायोग्यही राहत नाही.- राजेंद्र विधळे, वडाळी.कूलरमुळे वाढला ताणउन्हाळ्याच्या दिवसांत कूलरसाठी सर्वाधिक पाण्याची गरज असते. गार हवा आवश्यकच आहे; मात्र पाण्याची टंचाई भासत असल्यामुळे नागरिकांना विचार करावा लागत आहे. एकदा कूलरचे पाणी संपले की, दुसºयांदा पाणी टाकण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे अनेकांनी कूलर लावण्याच्या वेळासुद्धा ठरवून घेतल्या आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई