शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

पाण्यासाठी वणवण... कंत्राटदाराची देयके थांबवा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 15:54 IST

चारगाव पाणीपुरवठा योजना: कंत्राटदाराची मनमर्जी, एमजीपीची चुप्पी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाटात भीषण पाण्याची टंचाई सुरू असताना चिखलदरानजीक शहापूर, आलाडोह, मोथा व लवादा या चार गावांसाठी बागलिंगा प्रकल्पावरून पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनचे काम वेळेवर पूर्ण न केल्याने संबंधित कंत्राटदाराची देयके थांबविण्याचे पत्र मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले. संबंधित कामाचा चौकशी व कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

बागलिंगा प्रकल्पावरून ११ किलोमीटर अंतरावरील चिखलदरा नजीकच्या आलाडोह शहापूर मोथा व लवादा या चार गावांसाठी जवळपास २६ कोटी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ३१ मार्च २०२४ पूर्वी संबंधित पाणीपुरवठ्याचे काम करण्याचे आदेश होते. परंतु, शिव कन्स्ट्रक्शन (शिंगणापूर, जि. सातारा) या कंपनीने संबंधित काम वेळेत पूर्ण न केल्याने चारही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मेळघाटात भीषण पाण्याची टंचाई सुरू असताना संबंधित कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे प्रशासन व नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत असल्याच्या कारणावरून देयके अदा न करता संपूर्ण कामाची चौकशी व कारवाईची मागणी आ. पटेल यांनी केली आहे.

दरम्यान, पाण्याची मागणी सातत्याने वाढत असली तरी मेळघाटात नळावाटे शुद्ध पाण्याचा पुरवठा ठरलेल्या मुदतीत होत नाही. त्याला तांत्रिक अडचणी असतात की अन्य, हा संशोधनाचा विषय आहे.

दहा टक्के जादा दराने निविदासंबंधित कामाच्या निविदा दहा टक्के जादा दराने मंजूर करण्यात आल्या आहेत. निविदेतील अटी व शर्तीनुसार काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करणे गरजेचे होते. शासनाला त्याचा आर्थिक भुर्दंड व बसण्यासोबत नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

आगाऊ रक्कम देऊनही दर्जा निकृष्टपाईप लाईन व टाक्यांचे काम निकृष्ट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. टाकी बांधकामात क्यूरिंग केले जात नसल्याने दर्जाहीन काम तपासणीची मागणी आहे. दुसरीकडे मोबिलायझेशन अॅडव्हान्स अडीच कोटींपेक्षा अधिक रक्कम दिल्यावरही वेळकाढू धोरणाचा आरोप होत आहे.

पाइप लाइनचे काम अद्यापही अर्धवटच आहे.तक्रार प्राप्त झाली आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या परवानगीमुळे कामाला उशिरा सुरुवात झाली. काम लवकर करण्याच्या सूचना कंत्राटदाराला देण्यात येत आहे. अॅडव्हान्स रकमेतून कपात सुरू आहे. - अर्जुन भुमरे, उपविभागीय अभियंता, मजीप्रा अचलपूर 

टॅग्स :MelghatमेळघाटAmravatiअमरावतीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात