शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
2
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
3
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
4
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
5
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
6
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
7
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
8
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
9
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
10
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
11
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
12
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
13
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
14
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
15
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
16
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
17
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
18
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
19
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
20
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 

मोबाईल अ‍ॅपद्वारे पाणी नमुने; जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 1:28 AM

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने नागरिकांचे सुदृढ आरोग्य केंद्रस्थानी ठेवून राज्यभरात १ आॅक्टोबर ते ३१ ...

ठळक मुद्दे९१ टक्के काम : पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने नागरिकांचे सुदृढ आरोग्य केंद्रस्थानी ठेवून राज्यभरात १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात आला. यात अमरावती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ९१.७७ टक्के काम पूर्ण करून राज्यात दुसरा, तर विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे.राज्यभरात विविध जिल्हा परिषदांनी २ लाख ६९ हजार २४७ पैकी २ लाख ०२ हजार ५९३ पिण्याच्या पाण्याच्या मूळ स्रोतांचे नमुने घेतले व या स्रोतांचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे मॅपिंग करण्यात आले. यात अमरावती जिल्ह्याचे ७ हजार ८७६ एवढे उद्दिष्ट होते. त्यापैकी ७ हजार ७९४ स्रोतांचे पाणी नमुने घेण्यात आले, तर ७ हजार २२८ मूळ स्रोतांचे मॅपिंग करण्यात आले.जिल्ह्यात हे काम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी व गुणवत्ता नियंत्रण कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मानकर यांच्यासह पाणी गुणवत्ता सल्लागार नीलिमा इंगळे ,जिल्हा पाणी गुणवत्ता निरीक्षक राजेश चºहाटे आदींनी ग्रामस्तरावर सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून पूर्ण केले. यामुळेच जिल्हा राज्यात द्वितीय स्थानी आला आहे.जिल्हा परिषदेच्या पाणी व गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रमांतर्गत जलस्रोतांचे नमुने घेण्यात जिल्हा राज्यात दुसरा व विभागात अव्वल आहे. यापुढे राज्यात प्रथम क्रमांक गाठण्याचा आमचा प्रयत्न राहील.- मनीषा खत्रीसीईओ, जिल्हा परिषद

टॅग्स :MobileमोबाइलWaterपाणी