जलसंपदा मंत्र्यांचा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केला निषेध
By Admin | Updated: April 10, 2015 00:32 IST2015-04-10T00:32:35+5:302015-04-10T00:32:35+5:30
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव येथे मूकबधिर विद्यार्थ्याना साहित्य वाटप कार्यक्रमात कमरेला पिस्तूल लावून भाषण दिले .

जलसंपदा मंत्र्यांचा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केला निषेध
अमरावती : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव येथे मूकबधिर विद्यार्थ्याना साहित्य वाटप कार्यक्रमात कमरेला पिस्तूल लावून भाषण दिले . या कृ तीचा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसने गुरूवारी निषेध केला आहे.
आंदोलन कर्त्यानी यावेळी जलसंपदा मंत्री यांना प्लाटिकच्या बंंदुक त्याच्या पत्त्यावर पाठविल्या आहेत .मुकबधिर विद्यार्थ्या समोर अशी दबंग गिरी करणे ही बाब अतिशय गंभीर आहे. या अशोभनीय प्रकाराचा तिव्र निषेध नोदवून .भविष्यात असे प्रकार करणाऱ्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांन मार्फत शासनाला दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुशिल गावंडे, शिवाजी बुरंगे, विक्की खारोडे, रूपेश बाळे, सौरभ डहाके, शुभमदेशमुख, अंकुश सावळे, अमोल पाटील, शुभम होले, गोविंद हूदेकर प्रणव ओकटे आदीची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)