बडनेरा रेल्वे पोलीस ठाण्यात पाणी शिरले
By Admin | Updated: July 23, 2014 23:23 IST2014-07-23T23:23:55+5:302014-07-23T23:23:55+5:30
येथील रेल्वे पोलीस ठाणे, तिकीट बुकिंगचे जुने आॅफिस, रेल्वे बांधकाम विभागाच्या कार्यालयात बुधवारच्या मध्यरात्रीपासून पाणी शिरले. तसेच रेल्वे स्थानकाच्या आवारातही पाणीच पाणी असल्याने

बडनेरा रेल्वे पोलीस ठाण्यात पाणी शिरले
बडनेरा : येथील रेल्वे पोलीस ठाणे, तिकीट बुकिंगचे जुने आॅफिस, रेल्वे बांधकाम विभागाच्या कार्यालयात बुधवारच्या मध्यरात्रीपासून पाणी शिरले. तसेच रेल्वे स्थानकाच्या आवारातही पाणीच पाणी असल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकात ये-जा करणे कठीण झाले आहे.
दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. या पावसाचा बडनेऱ्यात सर्वाधिक फटका रेल्वे प्रशासनाला बसला आहे. बुधवारच्या मध्यरात्री येथील रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरले. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना कागदपत्रे सुरक्षित स्थळी हलवावी लागली. पोलीस ठाण्यातील लॉकअप व मालखान्यातही पाणी आहे. गुडघाभर पाणी पोलीस ठाण्यात साचलेले असून पाणी बाहेर काढताना रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांची दमछाक उडाली. तसेच रेल्वे तिकिटच्या जुन्या बुकिंग केंद्रापर्यंतही पावसाचे पाणी शिरल्याने प्रवाशांची अडचण निर्माण झाली आहे. रेल्वे स्थानकाच्या बाहेरील भागाची स्थिती तलावागत झाली आहे. रेल्वेच्या बांधकाम विभागाच्या कार्यालयातही पहाटे पाणी शिरले. वादळी पावसामुळे बडनेऱ्यातील अनेक भागांत झाडांची व काही ठिकाणी घरांच्या भिंतींची पडझड झाली. सुदैवाने जीवितहानीचे वृत्त नाही.