शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

२८ देशांच्या दूतावासात पोहोचली मेळघाटातील वारली पेंटिंग; पंतप्रधान मोदींनाही पाठवली शुभेच्छापत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 05:56 IST

चिखलदरा तालुक्याच्या जैतादेही येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी हा अभिनव उपक्रम राबविला.

नरेंद्र जावरे लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा (जि. अमरावती) : शिक्षकांना विषय सुचला, आदिवासी विद्यार्थ्यांच्या हातात कुंचला दिला नि महाराष्ट्राची ओळख असलेली वारली पेंटिंग कागदावर चितारण्यात आली. इवल्याशा हातांनी साकारलेली दिवाळीची शुभेच्छापत्रे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ते गावातील सरपंचापासून थेट सातासमुद्रापार अमेरिकेसारख्या देशातील मान्यवरांना त्या-त्या देशांच्या दूतावासामार्फत मेळघाटातून पाठवली जात आहेत. 

चिखलदरा तालुक्याच्या जैतादेही येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी हा अभिनव उपक्रम राबविला. पोस्टाद्वारे ही शुभेच्छापत्रे २८ देशांच्या दूतावासांकडे रवाना झाली आहेत. या शाळेने यापूर्वीसुद्धा राज्यस्तरावर मग्रारोहयोअंतर्गत परसबाग, फळबाग व जैवविविधता हा अभिनव उपक्रम राबविला होता. पुन्हा शाळेने दिवाळीनिमित्त आदिवासी विद्यार्थ्यांना शुभेच्छापत्रे बनविणे शिकवून त्यात भर घातली. शिक्षक गणेश जामूनकर, जितेंद्र राठी, शुभांगी येवले यांनी पहिली ते सातवीपर्यंतच्या ८७ विद्यार्थ्यांच्या हाताने हे कार्य झाले. इतरही विद्यार्थ्यांना हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे.अनाथालयातील विद्यार्थ्यांपासून ते युनो युनिसेफपर्यंत शुभेच्छा संदेशांचा प्रवास झाला आहे. जपान, अमेरिका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, कॅनडा, रशिया, फ्रान्स आदी देशांना शुभेच्छापत्र पाठविण्यात आली आहेत.

वारली पेंटिंग महाराष्ट्राची ओळखnदिवाळी शुभेच्छापत्रांच्या दर्शनी पृष्ठभागावर महाराष्ट्राची ओळख असलेली वारली पेंटिंग आदिवासी विद्यार्थ्यांनी काढली. nत्यावर दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा... असा संदेश देत पोस्टाद्वारे सातासमुद्रापार महाराष्ट्राची ओळख पाठविली गेली आहे. शाळेमार्फत विविध उपक्रम राबविले जातात. तिन्ही शिक्षकांनी हा अभिनव उपक्रम राबविण्याचे ठरविले आणि चिमुकल्या आदिवासी विद्यार्थ्यांकडून वारली पेंटिंग शुभेच्छापत्रे तयार करून ती आता देशाचे पंतप्रधान, सातासमुद्रापार व मान्यवरांना पोस्टाद्वारे पाठविली जात आहेत.- गणेश जामूनकर, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, जैतादेही, ता. चिखलदरा