नगरपंचायतींचे प्रभागनिहाय आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 05:00 IST2020-11-11T05:00:00+5:302020-11-11T05:00:09+5:30

तिवस्यात उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, तहसीलदार वैभव फरतारे, मुख्याधिकारी पल्लवी सोटे यांनी आरक्षण सोडत काढली. प्रभाग १ सर्वसाधारण स्त्री, प्रभाग २ नामाप्र स्त्री, प्रभाग ३ अनुसूचित जमाती, प्रभाग ४ अनुसूचित जाती स्त्री, प्रभाग ५ सर्वसाधारण, प्रभाग ६ सर्वसाधारण स्त्री, प्रभाग ७ सर्वसाधारण स्त्री,

Ward wise reservation of Nagar Panchayats | नगरपंचायतींचे प्रभागनिहाय आरक्षण

नगरपंचायतींचे प्रभागनिहाय आरक्षण

ठळक मुद्देतिवसा, नांदगाव, धारणीत १७ प्रभाग, मावळत्या सदस्यांना अन्यत्र लढवावी लागेल निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर/तिवसा/धारणी :
जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर, तिवसा व धारणी नगरपंचायतींची आरक्षण सोडत मंगळवारी सकाळी ११ वाजता काढण्यात आली.
नांदगाव खंडेश्वर येथे जुने तहसील सभागृहात यानिमित्त आयोजित सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांनी काम सांभाळले. यावेळी मुख्याधिकारी रवींद्र पाटील, प्रतीक करवा, स्वप्निल बनसोड, संजय चौधरकर, अभिजित लोखंडे, आशिष ढवळे सहभागी झाले. प्रभाग १ सर्वसाधारण, प्रभाग २ सर्वसाधारण महिला, प्रभाग ३ अनुसूचित जाती महिला, प्रभाग ४ अनुसूचित जाती, प्रभाग ५ अनुसूचित जमाती, प्रभाग ६ सर्वसाधारण, प्रभाग ७ सर्वसाधारण, प्रभाग ८ सर्वसाधारण, प्रभाग ९ सर्वसाधारण महिला, प्रभाग १० नामाप्र, प्रभाग ११ सर्वसाधारण महिला, प्रभाग १२ नामाप्र महिला, प्रभाग १३ नामाप्र, प्रभाग १४ नामाप्र महिला, प्रभाग १५ सर्वसाधारण महिला, प्रभाग १६ नामाप्र महिला, प्रभाग १७ सर्वसाधारण महिला गटाला आरक्षित झाला आहे.
तिवस्यात उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, तहसीलदार वैभव फरतारे, मुख्याधिकारी पल्लवी सोटे यांनी आरक्षण सोडत काढली. प्रभाग १ सर्वसाधारण स्त्री, प्रभाग २ नामाप्र स्त्री, प्रभाग ३ अनुसूचित जमाती, प्रभाग ४ अनुसूचित जाती स्त्री, प्रभाग ५ सर्वसाधारण, प्रभाग ६ सर्वसाधारण स्त्री, प्रभाग ७ सर्वसाधारण स्त्री, प्रभाग ८ नामाप्र, प्रभाग ९ सर्वसाधारण, प्रभाग १० सर्वसाधारण, प्रभाग ११ नामाप्र स्त्री, प्रभाग १२ नामाप्र स्त्री, प्रभाग १३ सर्वसाधारण स्त्री, प्रभाग १४ अनुसूचित जाती, प्रभाग १५ नामाप्र स्त्री, प्रभाग १६ अनुसूचित जाती, तर प्रभाग १७ मध्ये अनुसूचित जाती स्त्री असे आरक्षण निघाले आहे. धारणी नगरपंचायतीची आरक्षण सोडत मंगळवारी दुपारी १२ वाजता काढण्यात आली. प्रभाग १ मध्ये अनुसूचित जाती, प्रभाग २ अनुसूचित जाती महिला, प्रभाग ३ सर्वसाधारण महिला, प्रभाग ४ अनुसूचित जमाती महिला, प्रभाग ५ अनुसूचित जमाती महिला, प्रभाग ६ सर्व साधारण महिला, प्रभाग ७ सर्वसाधारण, प्रभाग ८ अनुसूचित जमाती, प्रभाग ९ नामाप्र, प्रभाग १० नामाप्र महिला, प्रभाग ११ नामाप्र, प्रभाग १२ अनुसूचित जमाती, प्रभाग १३ नामाप्र महिला, प्रभाग १४ सर्वसाधारण, प्रभाग १५ सर्वसाधारण महिला, प्रभाग १६ नामाप्र महिला, प्रभाग १७ सर्वसाधारण असे आरक्षण अपर जिल्हाधिकारी मिताली सेठी, मुख्याधिकारी सुधाकर पानझडे, संतोष खाडे यांनी जाहीर केले.

Web Title: Ward wise reservation of Nagar Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.