वणी ममदापूर जंगलात पुन्हा दोन ठिकाणी वणवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:13 IST2021-04-27T04:13:25+5:302021-04-27T04:13:25+5:30
तिवसा : एक दिवस उलटत नाही तोच सोमवारी पुन्हा तालुक्यातील वणी गाव परिसरातील जंगलाला दोन ठिकाणी आग ...

वणी ममदापूर जंगलात पुन्हा दोन ठिकाणी वणवा
तिवसा : एक दिवस उलटत नाही तोच सोमवारी पुन्हा तालुक्यातील वणी गाव परिसरातील जंगलाला दोन ठिकाणी आग लागली. ती पूर्णपणे विझवण्यात आली असली तरी या गावा परिसरातच का आग लागत आहे, हा प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे.
वारंवार आगी लागत असल्याने परिसरात भीती व्यक्त होत आहे. तालुक्यातील वणी या गावालगत जंगलाला दोन वर्षा पूर्वी लागलेल्या आगीने गावात रौद्ररूप धारण केले होते. अग्निशमन दल व गावकऱ्यांच्या सहकार्याने ती विझवण्यात यश आले होते. शनिवार, २४ एप्रिल रोजी ममदापूर येथे आग लागली होती. एक दिवस उलटत नाही तोच वणी व सुल्तानपूर या दोन गावांच्या परिसरात दोन ठिकाणी जंगलात आग लागली. गावकऱ्यांच्या मदतीने व अग्निशमन दलाच्या साह्याने आटोक्यात आणण्यात आली.