शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
2
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
3
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
5
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
6
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
7
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
8
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
9
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
10
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
11
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
12
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
13
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
14
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
15
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
16
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
17
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
18
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
19
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
20
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘वंदे मातरम्’चा जयघोष, ६०० फुटांचा तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST

शहरातील नेहरू मैदानातून सकाळी ११ वाजता रॅलीस प्रारंभ झाला. यामध्ये हातात तिरंगा व नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ फलक घेऊन सर्वच वयोगटातील हजारो नागरिक या महारॅलीत उस्फूर्तपणे सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी धडाकेबाज निर्णय घेतल्याबाबत त्यांच्या अभिनंदनाचे फलक महारॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच चौकांमध्ये लागले आहेत.

ठळक मुद्देसीएए, एनआरसीला पाठिंबा : दीडशेपेक्षा अधिक संघटनांचा सहभाग, शहरात मुख्य मार्गाने फिरली रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ गुरुवारी शहरात लोकाधिकार मंचद्वारे महारॅली काढण्यात आली. यामध्ये हजारो नागरिक तिरंगा व भगवे झेंडे घेऊन उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. या रॅलीला दीडशेवर संघटनांनी पाठिंबा दिला. रॅलीदरम्यान ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने शहराचा प्रत्येक चौक दुमदुमला. गगनभेदी घोषणा देत नागरिकांनी विधेयकाला पाठिंबा व्यक्त केला.शहरातील नेहरू मैदानातून सकाळी ११ वाजता रॅलीस प्रारंभ झाला. यामध्ये हातात तिरंगा व नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ फलक घेऊन सर्वच वयोगटातील हजारो नागरिक या महारॅलीत उस्फूर्तपणे सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी धडाकेबाज निर्णय घेतल्याबाबत त्यांच्या अभिनंदनाचे फलक महारॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच चौकांमध्ये लागले आहेत. रॅलीतदेखील ‘मोदी...मोदी...’ असा घोष करण्यात आला. याशिवाय ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘भारत माता की जय’, ‘भारत के सम्मान में, हम सब मैदान में’ आदी नारेदेखील आसमंतात गुंजले. तिरंगा हातात घेण्यासाठी अनेक युवकांची धडपड दिसून आली. देशभक्तीपर नारे, तिरंगा आदींमुळे रॅलीत राष्ट्रीय उत्सवासारखे वातावरण वाटत होते.रॅलीत ६०० फूट लांबीचा तिरंगा युवकांनी डोक्यावर धरला. या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. नेहरू मैदानातून निघालेली रॅली राजकमल चौक, श्याम चौक, सरोज चौक, मालवीय चौक, इर्वीन चौक, रेल्वे स्टेशन मार्गे पुन्हा नेहरू मैदानात दाखल झाली. येथे या रॅलीचे रूपांतर जाहीर सभेत झाले. या महारॅलीमध्ये भारतीय जनता पक्ष, आरएसएस, भाजयुमो, महिला आघाडी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यासह दीडशेवर संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले.रॅलीचे संयोजक बंटी पारवाणी, सहसंयोजक बादल कुळकर्णी, सुधीर बोपुलकर, नीलेश मारोडकर, सुरेखा लुंगारे आदी होते. रॅलीसाठी शहरात नियोजनबद्धपणे संवाद, प्रचार प्रसारासह सहभागाचे आवाहन करण्यात येत होते. भारतात राहणाऱ्या कुणाही नागरिकाला सीएए व एनआरसी कायद्यापासून धोका नाही, हे पटवून देण्यासोबत राष्ट्रहितासाठी या कायद्यांना पाठबळ मिळावे, असे आवाहन आयोजकांनी यादरम्यान केले. शहरातील प्रमुख मार्गाची वाहतूक तासभर खोळंबली होती. स्वत: सीपी संजय बावीस्कर यांनी निर्देश देऊन वाहतूक सुरळीत केली.उद्रेकाला विरोधक जबाबदार-हंसराज अहीरनागरिकत्व संशोधन कायद्यावरून देशामध्ये सध्या जो उद्रक होत आहे, त्यासाठी काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी रॅलीच्या समारोपाप्रसंगी जाहीर सभेत केला. यावेळी चंद्रशेखर भोंदू, हरीश हरकर, महापौर चेतन गावंडे, मोहनदादा अमृते, संतोष नवलानी, श्यामबाबा निचित, ज्ञानेश्वर रणपीसे, सचिन अंबाडकर, ज्ञानेश्वर खूपसे, आमदार अरुण अडसड, प्रवीण पोटे, माजी आमदार सुनील देशमुख, जगदीश गुप्ता, अनिल बोंडे, रमेश बुंदीले, अनिल साहू, जयंत डेहनकर, दिनेश सूर्यवंशी, शिवराय कुळकर्णी, किरण पातूरकर,निवेदिता चौधरी, बाळासाहेब भुयार, तुषार भारतीय, अजय सारस्कर, रमेश मावस्कर, विवेक कलोती, अनिल आसलकर, रीता मोकलकर यांसह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.दुपारपर्यंत बाजारपेठ बंदमहारॅलीच्या समर्थनार्थ काही व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिला व दुपारपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. विशेष म्हणजे, अनेक व्यापारीदेखील या रॅलीत सहभागी झाल्याचे दिसून आले. दुपारी १ नंतर दुकाने उघडायला सुरुवात झाली. या रॅलीसाठी चौकाचौकांत पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. नागरिकांनी नागरिकत्व संशोधन विधेयकाच्या समर्थनाच्या घोषणा दिल्या. नागरिक उत्साहात असले तरी पूर्वनियोजनानुसार ही महारॅली अगदी शांतपणे पार पडली.भारतमातेची प्रतिमा अग्रस्थानीराष्ट्रसमर्थन महारॅलीच्या अग्रस्थानी एका ट्रॅक्टरवर भारतमातेची प्रतिमा मांडली होती. रॅलीमध्ये हजारो नागरिकांचा सहभाग होता. रॅलीच्या संयोजकांनी गेल्या चार दिवसांपासून शहरातील नागरिक, व्यापारी सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना यांच्याशी नियोजनबद्धपणे संवाद साधल्याने या महारॅलीमध्ये समाजाच्या सर्व घटकांचे प्रतिनिधित्व दिसून आले. अनेक गटांनी ‘सीएए’ला समर्थन देत असताना स्वत:चे गटाचे अस्तित्व घोषणा, नारे अन् फलकांनी दाखवून दिले.