वाचनालयाची दीडशे वर्षाकडे वाटचाल

By Admin | Updated: February 11, 2015 00:25 IST2015-02-11T00:25:05+5:302015-02-11T00:25:05+5:30

अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरात ब्रिटिशकालिन सार्वजनिक वाचनालयाची सर्वात जुनी इमारत डौलाने उभी आहे.

Walking through the library for half a year | वाचनालयाची दीडशे वर्षाकडे वाटचाल

वाचनालयाची दीडशे वर्षाकडे वाटचाल

सुनील देशपांडे अचलपूर
अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरात ब्रिटिशकालिन सार्वजनिक वाचनालयाची सर्वात जुनी इमारत डौलाने उभी आहे. या वाचनालयाचा इतिहास बोध घेण्यासारखा आहे. हे वाचनालय आता दीडशे वर्षांकडे वाटचाल करीत आहे.
नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिहं विद्यते, ज्ञानामृतम भोजनम्, ज्ञानौपासना, हाच खरा निरामय आनंद. ज्ञानासारखे पवित्र आणि जीवनदायी दुसरे काही नाही. ज्ञान ही जीवनाची भाकर आहे. त्या ज्ञानाची आजची कोठारे म्हणजे ही ग्रंथालये म्हणजेच वाचनालये होते. या वाचनालयाची स्थापना ६ सप्टेंबर १८६६ रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर झाली. परतवाडा हे शहर सातपुड्याच्या पायथ्याशी रम्य परिसरात वसले आहे. प्रथम लष्कर म्हणजे कॅम्प म्हणून हे शहर वसविण्यात आले. लष्कर व जिल्ह्याचे ठिकाण या निमित्ताने परतवाडा येथे न्यायालय मुलकी व लष्करी अधिकारी व त्या अनुषंगाने वकिल वर्ग, व्यापारी या सर्वांचे वास्तव्य केंद्रित झाले. या वाचनालयाची स्थापना करण्यात वकिल, शिक्षक, व्यापारी, अधिकारी वर्ग तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांचा सिंहाचा वाटा होता. या वाचनालयाची सुरुवात एक छोट्या कौलारू घरात शंकर वामन नावाच्या वाचनप्रिय व खटपटी शिक्षकाने केली. त्याकाळी वर्गणीदारांची संख्या ६० होती. २८ आॅक्टोबर १९१४ रोजी इमारतीच्या पूर्व, पश्चिम व उत्तरेकडील ३ प्लॉटस् नझुलकडून मिळविण्यात आले. प्रथम १८६६ साली वाचनालय स्थापन झाले. तेव्हा नेटिव्ह जनरल लायब्ररी असे संस्थेचे नाव होते. सन १९२० साली संस्थेचे नवीन नियम झाले. तेव्हापासून संस्थेला सार्वजनिक वाचनालय परतवाडा हे नाव योजण्यात आले. सन १९४१ साली बाळासाहेब पांगारकर संस्थेचे प्रथम अध्यक्ष झाले. नाफडे, खांडेकर, चिपळुणकर, गंगाखेडकर, दादाजी अडोणी, सहस्त्रबुद्धे, मुऱ्हेकर, खापरे, भवाळकर, बर्वे, सोमण, दा. द. पट्टलवार, गोरे, तोंडगावकर, गुप्ते, खेरडे, चेंडके, ए. के. देशमुख, करकरे, ओहळे यांनी निरनिराळ्या परीने या वाचनालयाची सेवा केली. त्याकाळी वाचनालयात भाषणे, व्याख्यानमाला, वादविवाद, कीर्तने, जयंती, पुण्यतिथी समारंभ, महिलांचा शारदोत्सव व कोजागिरी कार्यक्रम धुमधडाक्यात होत असत.
दादासाहेब खापर्डे, शिवाजीराव पटवर्धन, आचार्य दादा धर्माधिकारी, मामा क्षीरसागर, पाचलेगावकर महाराज, केतकर, गो. स. सरदेसाई, य. खु. देशपांडे, गिरोलीकर महाराज, स्वा. सावरकर, दादा धर्माधिकारी, जनार्दन स्वामी, मधुकर आष्टीकर, जु. भा. भावे, मधुकर केचे, काका कागलकर, राम शेवाळकर, वामन चोरघडे, सेतु माधवराव पगडी, राम रानडे, गो. नि. दांडेकर, बॅरी. राठनर बाबा मोहोड, यु. म. पठाण, मुजफ्फर हुसेन, मा. गो. वैद्य, मारूती चित्तमपल्ली, वसंत रायपूरकर, वि. आ. बुवा, रमेश पतंगे, दादा पणशिकर, नितीन गडकरी, पंकज चांदे, संत अच्युत महाराज, विवेक घळसासी, सुरेश द्वादशीवार, कुमार शास्त्री या विद्वान साहित्यकारांची भाषणे, व्याख्यानमाला व भेटी देऊन वाचनालयाचे कौतुक केले. तत्कालिन अध्यक्ष पा. म. धर्माधिकारी यांनी वाचनालयाच्या उत्पन्नात भर पडावी या हेतूने परिसरात दुकानाचे २८ गाळे बांधून भरपूर योगदान दिले हे विशेष तत्कालिन अध्यक्ष पां. म. धर्माधिकारी, दिवाकर कुळकर्णी, कै. अण्णाजी पार्डीकर, धुं. अ. बर्वे यांच्या कारकिर्दित ११ मे २००६ रोजी महाराष्ट्र शासनाचा शतायु ग्रंथालयाचा ५ लाखाचा पुरस्कार मिळाला.
आज या १४९ वर्षे झालेल्या वाचनालयाचे अध्यक्ष प्र. ग. मोरे, उपाध्यक्ष दि. ल. कुळकर्णी, सचिव धुं. अ. बर्वे नि:स्वार्थपणे काम पाहत आहेत. सोबतच १२ कार्यकारिणी सदस्य त्यांना सहकार्य करीत आहे. ग्रंथपाल सुरेश पट्टलवार व लिपीक संदिप तोंडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा देत आहेत.

Web Title: Walking through the library for half a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.