शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाट विधानसभेतील सहा गावांत मतदानाचा टक्का शून्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 13:00 IST

लोकसभा निवडणूक : धारणीतील सहा गावांचा बहिष्कार कायम

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : लोकसभा निवडणुकीत सर्वत्र मतदान होत असताना मेळघाटातील सहा गावांमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत शून्य टक्के मतदान झाले. धारणी तालुक्यातील या गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणेने त्यांची मनधरणी सुद्धा केली. परंतु, शुक्रवारी मतदानाच्या दिवशी एकही मतदाता फिरकला नाही.

धारणी तहसील अंतर्गत ग्रामपंचायत रंगूबेली आहे. त्याअंतर्गत रंगुबेली, कुंड, धोकरा, खामदा, किन्हीखेडा, खोपमार ही गावे आहेत. या गावांमध्ये महावितरणची वीज, पिण्यासाठी शुद्ध पाणी, पक्के रस्ते, आरोग्य सेवा केंद्र आदी सुविधा नाहीत. कोणी आजारी पडले, तर त्याला खासगी दवाखान्यात न्यावे लागते, गावात जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे एकही वाहन जाऊ शकत नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक तथा महसूल व ग्रामविकास यंत्रणेने त्यांची मतदानासाठी मनधरणी केली होती. मात्र ते ठाम राहिले.

दोन हजार मतदाते सहा गावांमध्ये सुमारे दोन हजार मतदार असून लोकसभा निवडणुकीत कोणीही मतदान करणार नाही, असा सर्वानी एकमताने निर्णय घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. रंगुबेली गावात सौरदिवे बसवण्यात आले आहेत. यानंतरही अडचणी येत आहेत. गावात वीज उपलब्ध करून देण्याची त्यांची मागणी आहे.

धारणी तालुक्यातील सहा गावांमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत शून्य टक्के मतदान झाले आहे. निवडणुकीवर त्यांनी बहिष्कार घातला होता. त्यांना लोकशाहीचा हा हक्क बजावण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने मनधरणी केली होती. मतदान होण्याची अपेक्षा आहे.- प्रदीप शेवाळे, तहसीलदार, धारणी 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४ElectionनिवडणूकVotingमतदानMelghatमेळघाट