शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

व्हीएमव्ही परिसरात दुसऱ्यांदा दिसला बिबट; वनविभागाचे ‘सर्च’ अभियान

By admin | Updated: November 18, 2014 22:45 IST

कठोरा नाक्याजवळील व्हीएमव्ही परिसरात सोमवारी रात्री ११.३० वाजता दरम्यान पुन्हा बिबट आढळल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. त्यामुळे वनविभागानेही परिसर पिंजून काढला

अमरावती : कठोरा नाक्याजवळील व्हीएमव्ही परिसरात सोमवारी रात्री ११.३० वाजता दरम्यान पुन्हा बिबट आढळल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. त्यामुळे वनविभागानेही परिसर पिंजून काढला असून अद्यापपर्यंत या परिसरात बिबट आढळल्याचे कोणतेही ठोस पुरावे हाती लागले नाहीत. कठोरा नाक्याजवळील रहिवासी जहीर खान हे भाजीविक्रेता आहेत. ते रात्रीच्या वेळी याच भागातील पाण्याच्या टाकी परिसरात चौकीदारी करतात. सोमवारी रात्री ११.३० वाजता सुमारास जहीर खान व त्यांचा आसेगाव पूर्णा येथील रहिवासी मित्र सोबत होते. दरम्यान जहीर खान हा पाण्याच्या टाकीमागील परिसरात शौचास गेला होता. त्यावेळी पाण्याच्या टाकी लगतच्या परिसरातच त्यांना बिबट आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. ही बाब जहीर खान याने त्यांच्या मित्राला सांगितली. त्यांनी तत्काळ वनविभागाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून व्ही.एम.व्ही. परिसरात बिबट आढळल्याची माहिती दिली. रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास वन विभागाच्या शिकारी प्रतिबंधक पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी डब्ल्यू. जी. शेख, वन कर्मचारी पी. टी. वानखडे, अमोल गावनेर , फिरोज खान, सतीश उमक व अमित शिंदे यांचे पथक व्हीएमव्ही परिसरात पोहाचले.