शिक्षण सभापतींनी दिल्या शाळांना भेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:10 IST2021-06-29T04:10:20+5:302021-06-29T04:10:20+5:30
अमरावती : महापालिकेचे शिक्षण सभापती आशिष गावंडे व शिक्षणाधिकारी अब्दूल राजिक यांनी विविध शाळांना भेटी दिल्या. पहिलीच्या प्रवेशासाठी ...

शिक्षण सभापतींनी दिल्या शाळांना भेटी
अमरावती : महापालिकेचे शिक्षण सभापती आशिष गावंडे व शिक्षणाधिकारी अब्दूल राजिक यांनी विविध शाळांना भेटी दिल्या. पहिलीच्या प्रवेशासाठी उपस्थित पालकांशी व शिक्षकांशी त्यांनी संवाद साधला.
--------------
कलेक्ट्रेटचे गेट केव्हा उघडणार?
(फोटो)
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट चार महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांनी त्रास होत आहे. तीनपैकी किमान एकतरी गेट उघडण्यात आल्यास नागरिकांच्या सोईचे होणार आहे.
--------------------
संचारबंदीत अनेक दुकाने सुरू
अमरावती : सोमवारपासून दुकानास ४ पर्यंतची मुभा असली तरी बहुतांश दुकाने यानंतर सुरू असल्याचे दिसून आले. या दुकानांवर कारवाई केव्हा, असा नागरिकांचा सवाल आहे.
--------------------
जिल्ह्यात सोमवारी तुरळक पाऊस
अमरावती : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हलक्या स्वरूपात पावसाची नोंद झाली. यामुळे दिवसभराच्या उकाड्यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाल्याने काहीसा दिलासा मिळाला.
----------------------------
सोमवारी शहरात सहा रुग्णांची नोंद
अमरावती : जिल्ह्यात सोमवारी २८ रुग्णांची नोंद झाली. मात्र, यात महापालिका क्षेत्रातील सहा रुग्णांचा समावेश आहे. यामध्येही पाच जण एकाच परिवारातील असल्याची नोंद आहे.
---------------------