नियमांचे उल्लंघन, दुकाने सील करण्याचा सपाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:13 IST2021-05-11T04:13:13+5:302021-05-11T04:13:13+5:30
अमरावती : जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर महापालिकेच्या बाजार व परवाना तसेच अतिक्रमण विभागाद्वारा सोमवारी कारवाया करून ...

नियमांचे उल्लंघन, दुकाने सील करण्याचा सपाटा
अमरावती : जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर महापालिकेच्या बाजार व परवाना तसेच अतिक्रमण विभागाद्वारा सोमवारी कारवाया करून दंड वसूल करण्यात आले व प्रतिष्ठाने सीलदेखील करण्यात आली आहेत.
अतिक्रमण विभागामार्फत एस.एम.९ मोबाईल ॲक्सेसरीज दुकान, राम लक्ष्मण संकुल, रामपुरी कॅम्प चौक, बिजासेन माता दूध डेअरी, मसानगंज, राधेशाम दूध डेअरी, अकोली रोड यांनी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्याला सील करण्यात आले. या कारवाईत अतिक्रमण पथकप्रमुख अजय बंन्सेले, योगेश कोल्हे, श्याम चावरे व कर्मचारी उपस्थित होते. बाजार परवाना विभागामार्फत द्वारकानगर येथील भोले ट्रेडर्स सील करण्यात आले.
बॉक्स
पेट्रोलपंपावर कारवाई
झोन क्रमांक ५ मध्ये नोडल अधिकारी पि.एम. वानखडे, सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी संजय गंगात्रे, जेष्ठ स्वास्थ्य निरीक्षक विकी जेधे यांच्या उपस्थितीत चांदनी चौक, पठान चौक, ताजनगर, लालखडी चौक, वलगाव रोड, जमील कॉलनी, असोरिया पेट्रोल पंप चौक या परिसरात ईसार पेट्रोल पंप १३,०००, आस्थापना सामाजिक अंतर बाबत ३०००, टेस्ट नसल्याबाबत १०००, मास्क बाबत तीन नागरिकांकडून १५०० रूपये दंड वसूल करण्यात आला.