विनोद शिवकुमारच्या जामिनावर आज निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:13 IST2021-04-22T04:13:48+5:302021-04-22T04:13:48+5:30
हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांना प्रचंड मनस्ताप आणि त्रास दिल्याने त्यांनी २५ मार्च रोजी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या ...

विनोद शिवकुमारच्या जामिनावर आज निर्णय
हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांना प्रचंड मनस्ताप आणि त्रास दिल्याने त्यांनी २५ मार्च रोजी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी गुगामल वन्यजीव विभागाचा उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याने कशाप्रकारे त्रास दिला, हे चिठ्ठीत लिहिले होते. त्याला धारणी पोलिसांनी अटक करून धारणी न्यायालयात हजर केले असता, पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तेव्हापासून तो अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आहे. त्याच्या जामिनासाठी वकिलांमार्फत अचलपूर येथील न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. न्यायालयाने तपास अधिकारी तथा सरकारी अभियोक्ता यांना सरकारची बाजू मांडण्यासाठी सांगितले होते. त्यावर १९ एप्रिल रोजी सरकारी अभियोक्ता बी. आर. चव्हाण व तपास अधिकारी तथा एसडीपीओ पूनम पाटील यांनी प्रथम तदर्थ व सत्र न्यायाधीश एस. के. मुंगीनवार यांच्या न्यायालयात से दाखल केला. त्यावर आता २२ एप्रिल रोजी युक्तिवाद होऊन जामिनावर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोपी विनोद शिवकुमार ला जामीन की, कारागृह यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहे.