विठ्ठलनामाची शाळा भरली...
By Admin | Updated: July 8, 2014 23:12 IST2014-07-08T23:12:32+5:302014-07-08T23:12:32+5:30
आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी एव्हाना पंढरपुरला जाऊन पोहोचले आहेत. अवघ्या शहरालाही उद्या बुधवारी पंढरपूर नगरीचे स्वरुप येणार आहे. शहराच्या कानाकोपऱ्यातील

विठ्ठलनामाची शाळा भरली...
आषाढी एकादशी उत्सव : शहरातील मंदिरे सजली, विविध धार्मिक कार्यक्रम
अमरावती : आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी एव्हाना पंढरपुरला जाऊन पोहोचले आहेत. अवघ्या शहरालाही उद्या बुधवारी पंढरपूर नगरीचे स्वरुप येणार आहे. शहराच्या कानाकोपऱ्यातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरांमध्ये आषाढी एकादशी उत्सवाला सुरुवात झाली आहे. भजन, कीर्तन, प्रवचन आणि हरीपाठाच्या निनादासह विठ्ठल नामाच्या जयघोषाने उद्या अंबानगरी दुमदुमणार आहे.
दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पढंरपूर येथे विठ्ठल-रुख्मिणी दर्शनासाठी देशभरातून भाविक मंडळी जातात. मनभावनेतून विठ्ठलाची आराधना करीत हजारो वारकरी हरी नामाचा गजर करीत पायी पंढरपूर जातात. त्यामुळे लाखो भाविकांची मांदीयाळी पढंरपुरामध्ये पाहायला मिळते. या शुभपर्वावर अमरावती शहरातील विठ्ठल रुख्मिणी मंदिरामध्येही या दिशवी मोठी गर्दी पाहायला मिळत असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविक भक्त एकादशी निमित्त उपवास ठेऊन विठ्ठलाला साकडे घालतात.
बुधवारी आषाढी एकादशी निमित्त शहरातील विविध मंदिरांमध्ये भजन कीर्तनाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. प्रत्येक मंदिरे रोषणाईने सजली असून विठ्ठल नामाच्या गजराने अवघी अमरावती आज दुमदुमणार आहे.