Video - ...अन् श्वान शिकारीच्या नादात बिबट्या पडला विहिरीत; पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 10:02 IST2021-08-14T09:55:04+5:302021-08-14T10:02:52+5:30
Video Leopard and dog fell into the well in Amaravati : घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी रेस्क्यू टीम तसेच बडनेरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Video - ...अन् श्वान शिकारीच्या नादात बिबट्या पडला विहिरीत; पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी
बडनेरा (अमरावती) : बडनेरा ते अंजनगाव बारी मार्गालगतच्या मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या एका शेतातील विहिरीत बिबट्या आढळून आला आहे. श्वानाची शिकार करण्यासाठी त्याने उडी मारली असताना कुत्र्यासह बिबट्या देखील विहिरीत पडल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी रेस्क्यू टीम तसेच बडनेरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बिबट्या व श्वानाला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे.
अमरावती - बिबट्या आणि कुत्रा एकाच विहिरीत पडले. राम मेघे कॉलेज जवळील घटना, वनविभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल. https://t.co/CbvSFUjpi9#leopard#Dogpic.twitter.com/IVAqKblTET
— Lokmat (@MiLOKMAT) August 14, 2021