तरुणीचे टक्कल करून व्हिडीओ केला व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 01:05 AM2018-05-24T01:05:29+5:302018-05-24T01:05:29+5:30

चारित्र्याच्या संशयातून नातेवाइकांचे कृत्य

Video clipped viral on the girl's forehead | तरुणीचे टक्कल करून व्हिडीओ केला व्हायरल

तरुणीचे टक्कल करून व्हिडीओ केला व्हायरल

Next

अमरावती : एका १९ वर्षीय तरुणीचे टक्कल करून, त्याचा व्हिडीओ व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार नांदगावपेठ हद्दीतील धोतरा गावालगतच्या जंगलात घडला. पीडितेने बुधवारी पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्याकडे याची तक्रार केल्यानंतर त्यांनी नांदगावपेठ पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. चारित्र्यावरील संशयातून हा प्रकार घडल्याची शक्यता आहे.
आई-वडील हयात नसलेली ही १९ वर्षीय तरुणी तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बु. येथे दोन लहान भावांसोबत राहते. तिचे नातेवाईक अनिल भोसले, करणसिंग पवार, राहुल भोसले व राजा वाघाडे मंगळवारी तिच्या घरी आले. जबरदस्तीने तिला दुचाकीवरून त्यांनी धोतरा गावालगतच्या जंगलात नेले. तेथे हातपाय बांधून तिचे टक्कल केले. तसेच याचा व्हिडीओ काढून व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल केला, असे पीडितेने म्हटले आहे.
याची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली. भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी बुधवारी पीडितेला घेऊन डीसीपींकडे तक्रार केली.

हा प्रकार गंभीर असून, हे कृत्य करणाºयांना मोकाट सोडले जाणार नाही. चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश नांदगाव पेठ पोलिसांना दिले आहेत.
- चिन्मय पंडित, पोलीस उपायुक्त.

Web Title: Video clipped viral on the girl's forehead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा