शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
3
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
4
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
5
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
6
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
7
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
8
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
9
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
10
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
11
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
12
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
13
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
14
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
15
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
16
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
17
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
18
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
19
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
20
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS

पूर्व विदर्भ, मराठवाड्यावर जलसंकट, व-हाडात ३८ टक्के जलसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 16:53 IST

धरणातील जलसाठा झपाट्याने कमी होऊ लागल्याने पूर्व विदर्भ व मराठवाडा विभागाावर जलसंकट घोंगावते आहे.

- प्रदीप भाकरेअमरावती : धरणातील जलसाठा झपाट्याने कमी होऊ लागल्याने पूर्व विदर्भ व मराठवाडा विभागाावर जलसंकट घोंगावते आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात नागपूर विभागातील ३८४ धरणांमध्ये केवळ २३.५२, तर औरंगाबाद विभागातील ९६४ धरणांमध्ये १४.८ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. त्यांच्या किंचित पुढे असलेल्या अमरावती विभागातील जलसाठ्याची टक्केवारी (३८.९६) फारशी सुखावह नाही. राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जानेवारीतच राज्याच्या अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.जलसंपदा विभागाने प्रसिद्ध केलेल्या सांख्यिकीनुसार, राज्यातील एकूण ३२६७ धरणांमध्ये १४ जानेवारी अखेरीस केवळ ४२.६९ टक्केच उपयुक्त जलसंचय आहे. गतवर्षीच्या १४ जानेवारी रोजी ती टक्केवारी ६०.५ टक्के अशी होती. अर्थात गतवर्षीच्या तुलनेत यंदा जलसंकट अधिक तीव्र होण्याची दुश्चिन्हे आहेत. अमरावती विभागातील ४४६ जलप्रकल्पांमध्ये ३८.९६ टक्के, औरंगाबाद विभागातील ९६४ प्रकल्पांमध्ये केवळ १४.८ टक्के, कोकण विभागातील १७६ प्रकल्पांमध्ये ६६.४९ टक्के, नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांमध्ये २३.५२ टक्के, नाशिक विभागातील ५७१ प्रकल्पांमध्ये ४२ टक्के व पुणे विभागातील ७२६ प्रकल्पांमध्ये ५७.८३ अशा एकूण ३२६७ प्रकल्पांमध्ये एकूण ४२.६९ टक्की उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.-------------लघू प्रकल्प कोरडेराज्यातील १४१ मोठ्या प्रकल्पांमध्ये ४६.१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी हीच टक्केवारी ६५.३४ अशी होती. एकूण २५८ मध्यम प्रकल्पांमध्ये ४१.१७ टक्के (गतवर्षी ५५.९२ टक्के), तर २८६८ लघु प्रकल्पांमध्ये केवळ २८.४७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच लघु प्रकल्पांमध्ये ४२.३३ टक्के जलसंचय होता.--------४२४७ गाव-वाड्यांत टँकरवारीराज्यातील १३०८ गावे व २९३९ वाड्यांमध्ये एकूण १५६८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ही सांख्यिकी ७ जानेवारीची असून, १४ जानेवारीपर्यंत त्यात आणखी वाढ होणार आहे. गतवर्षी केवळ १८७ गावांना १५० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. टँकरची स्थिती पाहता, गतवर्षीच्या तुलनेत टँकरच्या संख्येत तब्बल दहापट वाढ नोंदविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नागपूर विभागातील उपयुक्त जलसाठा २३ टक्क््यांच्या आसपास असताना येथे अद्यापही टँकर पोहोचलेले नाहीत.

टॅग्स :Waterपाणी