शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पीडित मुलगी बयाण देण्यास अद्यापही असमर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 6:00 AM

लालखडी परिसरातील मदरशात १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी उघड झाल्यानंतर नागपुरी गेट पोलिसांनी मुफ्ती जियाउल्ला खान व फिरदौस जहा नामक महिलेला अटक केली. त्याला पहिल्यांदा दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली, मात्र, त्याने गुन्ह्याची कबुली दिली नाही.

ठळक मुद्देजियाउल्लाला १५ पर्यंत पीसीआर : मुलींचे बयाण नोंदविण्याच्या प्रक्रियेला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मदरशातील लैंगिक अत्याचारपीडित मुलगी अद्यापही मानसिक धक्क्यातून सावरलेली नाही. त्यामुळे तिचे बयाण पोलिसांनी नोंदविले नाही. तिच्या बयाणानंतर या प्रकरणातील रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी मदरशाचा संस्थाध्यक्ष मुफ्ती जियाउल्ला खानला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे. मंगळवारपर्यंत पोलिसांनी मरदशातील कर्मचारी व मुली असे १५ जणांचे बयाण नोंदविले आहेत.लालखडी परिसरातील मदरशात १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी उघड झाल्यानंतर नागपुरी गेट पोलिसांनी मुफ्ती जियाउल्ला खान व फिरदौस जहा नामक महिलेला अटक केली. त्याला पहिल्यांदा दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली, मात्र, त्याने गुन्ह्याची कबुली दिली नाही. फिरदौसची चार दिवसांच्या पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे. १३ नोव्हेंबर रोजी तिची पोलीस कोठडी संपणार आहे. जियाउल्ला खानची पोलीस कोठडी संपल्याने त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. पीडित मुलीचे बयाण अद्यापपर्यंत नोंदविले नाही, ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी मुफ्ती जियाउल्ला खानच्या कोठडीची मागणी न्यायालयात केली.पीडित मुलीचे बयाण व्हायचे आहे. ती बयाण देण्यास मानसिकदृष्ट्या अद्यापही असमर्थ आहे. तिच्या बयाणानंतर नवीन बाबी समोर येऊ शकतात. त्या अनुषंगाने आरोपींची चौकशी करण्यात येईल. मुख्य आरोपी १५ पर्यंत पोलीस कोठडीत आहे.- अर्जुन ठोसरे, पोलीस निरीक्षक, नागपुरी गेट.

टॅग्स :Rapeबलात्कार