सात तास टॉवरवर वीरुगिरी
By Admin | Updated: July 8, 2014 23:13 IST2014-07-08T23:13:21+5:302014-07-08T23:13:21+5:30
शेतामध्ये सुरु असणाऱ्या टॉवर लाईनच्या कामामुळे होणाऱ्या नुकसानामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात टॉवरवर चढून तब्बल सात तास ‘वीरुगिरी’ आंंदोलन केले.

सात तास टॉवरवर वीरुगिरी
अमरावती : शेतामध्ये सुरु असणाऱ्या टॉवर लाईनच्या कामामुळे होणाऱ्या नुकसानामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात टॉवरवर चढून तब्बल सात तास ‘वीरुगिरी’ आंंदोलन केले. नांदगाव पेठ येथील औद्योगिक वसाहत परिसरातील सोफिया विद्युत प्रकल्पाच्या टॉवर लाईनचे काम सुरु आहे. या टॉवरचे काम आष्टी, वायगाव, जावरा, कामनापूर आणि वलगाव या परिसरातही सुरुआहे.'
शेती कामे खोळंबली
या कामामुळे टॉवरवरची विद्युत लाईन अनेक शेतकऱ्यांच््या शेतीमधुन गेली आहे. विद्युत तार टाकण्याचे काम सुरु असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये विद्युत तारा खाली पडुन आहे. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहे. या विद्युत तारा उचलण्यात याव्या अशी मागणी मागील काही महीन्यापासुन शेतकरी करीत आहे.याकरीता शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यातही तक्रार केली आहे.मात्र अद्यापही कोणतीही कारवाई केली गेली नाही. आता पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतीमध्ये पेरणी करण्याचे काम सुरु आहे.मात्र शेतात पडलेल्या विद्युत तारेमुळे पाच गावामध्ये असणाऱ्या शेतातील पेरणीचे कामे खोळबंली आहे. अनेक वेळा निवेदने व तक्रारीकरुनही विद्युत तारा उचलल्या जात न गेल्याने मंगळवारी सकाळी ८.४५ वाजता प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष छोटु वसु यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी वायगावातील टॉवरवर चढुन विरुगीरी आंदोलन सुर केले.जोपर्यंत टॉवर लाईनचे तारा हटविण्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याची घोषणा प्रहार कार्यकर्त्यांनी केली. या आंदोलनाची माहिती वलगाव पोलीसांना मिळताच पोलीसाचा ताफा वायगावात दाखल झाला. पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना टॉवरवरुन खाली उतरविण्याचे प्रयत्न केले मात्र आधी विद्युत तारा उचला व नुकसान भरपाई द्या अशी मागणी प्रहार कार्यकर्त्यांनी रेटुन धरली होती. पोलीसांनी या आंदोलनात दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास टॉवरवरुन उडी टाकण्याची धमकी आंदोलनकर्त्यानी यावेळी दीली.शेवटी दुपारी ४ वाजता दरम्यान इंडिया बुल कंपनीचे अधिकारी व तहसीलदार यांच्या निर्देशाहुन पटवारी व अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले. दोन दिवसाच्या आत शेतकऱ्यांना शेतीचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आल्यावर आंदोलनकर्ते टॉवरहुन खाली उतरले.