ऑनलाईन अर्जासाठी वणवण

By Admin | Updated: May 8, 2014 00:50 IST2014-05-08T00:50:11+5:302014-05-08T00:50:11+5:30

सर्वच विभागातील भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. त्यामुळे नोकरीचे अर्ज विक्री होणार्‍या स्टॉलवर ..

Verification for online application | ऑनलाईन अर्जासाठी वणवण

ऑनलाईन अर्जासाठी वणवण

ग्रामीण भागात अडचण : वेबसाईट स्लो
 

अमरावती : सर्वच विभागातील भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. त्यामुळे नोकरीचे अर्ज विक्री होणार्‍या स्टॉलवर सध्या नोकरी संदर्भातील अर्जाऐवजी फक्त माहितीपत्रकांची सुशिक्षित बेरोजगारांना खरेदी करावे लागत आहे.भरती संदर्भातील अर्ज प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अडचण होत आहे.
सध्या सरकारी, निमसरकारी पदासाठीची भरती प्रक्रिया सुरू आहे.यात पोलीस विभागासह इतर विभागात रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्याचप्रमाणे एमपीएससीच्या माध्यमातून अनेक पदांची भरती सुरू असते.त्यासाठीची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे.त्यामुळे शहरासह जिल्ह्यात नोकरीचे अर्ज विक्री करणार्‍या स्टॉलवर भरती प्रक्रियेसंदर्भातील फक्त माहिती देण्यात आली असून ऑनलाईन अर्ज करण्याची सूचना करण्यात आली आहे.त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफेची मदत घ्यावी लागत आहे.
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान नाही.त्याचप्रमाणे इंटरनेट अथवा कॉम्प्युटरचा वापर करणार्‍यांची संख्या अल्प प्रमाणात आहे. त्यामुळे नोकरीचा अर्ज भरण्यासाठी ग्रामीण भागातील उमेदवारांची अडचण होत आहे.त्यांना यासाठी सायबर कॅफेची मदत घ्यावी लागते.काही विद्यार्थ्याची मुख्य अडचण इंटरनेटवर स्थानिक भाषांमधून माहिती उपलब्ध नसणे ही आहे. त्यामुळे संगणकाचे ज्ञान असले तरी भरण्यास त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांकडून एका अर्जासाठी परीक्षा फी वगळता जवळपास ५0 ते ७0 रूपये आकारले जात आहेत.
वेबसाईट चालत नाही
ऑनलाईन अर्ज भरताना अनेक वेळा वेबसाईट संथगतीने काम करते. त्यामुळे अर्ज भरावयाला अधिक वेळ लागतो.
मुदत संपण्याच्या शेवटच्या आठवड्यात वेबसाईट बंदच असल्याचा अनुभव वेळोवेळी अनेकांना आला आहे.(प्रतिनिधी)

आता सर्वच अर्ज ऑनलाईन भरावे लागतात. अर्ज भरण्यासाठी एकाच वेळी उमेदवार गर्दी करतात. त्यामुळे अनेक वेळा वेबसाईट स्लो झालेली असते.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती नसते.त्यामुळे त्यांना पूर्ण अर्ज भरून द्यावा लागतो.
राजेंद्र इंगळे
सायबर संचालक, अमरावती.

Web Title: Verification for online application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.