आकाशात दिसताहेत शुक्र, शनी, गुरु ग्रह
By Admin | Updated: May 30, 2015 00:36 IST2015-05-30T00:36:00+5:302015-05-30T00:36:00+5:30
पृथ्वीपासून सर्वात जवळचे ग्रह शुक्र व सूर्यमालेतील गुरु आणि शनी हे सायंकाळी अगदी साध्या डोळ्यांनी पाहण्याची ....

आकाशात दिसताहेत शुक्र, शनी, गुरु ग्रह
अमरावती : पृथ्वीपासून सर्वात जवळचे ग्रह शुक्र व सूर्यमालेतील गुरु आणि शनी हे सायंकाळी अगदी साध्या डोळ्यांनी पाहण्याची संधी अमरावतीकरांना मिळाली आहे. शहरातील खगोलप्रेमींनी व जिज्ञासूंनी हे ग्रह टेलिस्कोपमधून पाहण्यासाठी गर्दी केली आहे.
सूर्य मावळ्याताच पश्मिच दिशेच्या क्षितिजावर सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत शुक्र ग्रह दिसत आहे. हा ग्रह चकमत असल्यामुळे सहज ओळखता येऊ शकतो. या ग्रहाच्या सुंदर कला केवळे टेलिस्कोपमधूनच पाहता येऊ शकतात. याचवेळी गुरु ग्रहा सुध्दा मध्य आकाशात पाहता येतो. याग्रहाचे चार चंद्र दिसून येत असून ते साध्या डोळ्यानी पाहता येऊ शकतात. गुरुवरचा रेड स्पॉट टेलीस्कोपमधून बघता येतात. विलोभनीय रिंग असणारा ग्रह शनी हा सुध्दा सूर्य मावळ्यानंतर पुर्वे दिशेने दिसत आहे. या तीन्ही ग्रहाचा राशीनुसार मानवी जीवनावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे कर्मकांडाच्या मागे न लागता तिन्ही ग्रहाचे निरीक्षण करुन आनंद घेतला पाहिजे, असे आवाहन हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी केले आहे. खगोलशास्त्रातील एक घटना म्हणून या घटनेकडे बघून ज्ञानवृध्दी करावी, असे आवाहन गिरूळकर यांनी केले आहे.