वाहनमालकांनो, कागदपत्रांची पूर्तता करून वाहन ताब्यात घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:11 IST2021-05-29T04:11:32+5:302021-05-29T04:11:32+5:30

अमरावती : सन २०११ ते २०२० या कालावधीत बडनेरा पोलीस ठाण्याकडून हुडकून काढण्यात आलेली, मात्र मालकाचा पत्ता नसलेली दुचाकी ...

Vehicle owners, take possession of the vehicle by completing the documents | वाहनमालकांनो, कागदपत्रांची पूर्तता करून वाहन ताब्यात घ्या

वाहनमालकांनो, कागदपत्रांची पूर्तता करून वाहन ताब्यात घ्या

अमरावती : सन २०११ ते २०२० या कालावधीत बडनेरा पोलीस ठाण्याकडून हुडकून काढण्यात आलेली, मात्र मालकाचा पत्ता नसलेली दुचाकी वाहने लिलावात काढली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अनेक वर्षांपासून ही वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात भंगार अवस्थेत पडली आहेत.

पोलिसांनी सदर वाहनांच्या क्रमांकासह यादी जारी केली असून, वाहन हरविलेल्या व्यक्तींनी बडनेरा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. वाहनाची ओळख पटवून आवश्यक कागदपत्आंची पूर्तता केल्यास ती परत दिली जाईल, असे आवाहन बडनेराचे ठाणेदार पंजाब वंजारी यांनी केले.

बॉक्स

वरिष्ठांच्या परवानगीने वाहनांचा लिलाव

बेवारस वाहनांमध्ये दोन लुना, १५ मोटारसायकली व दोन चारचाकी वाहनांचा समावेश आहे. वाहनमालकांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यास वरिष्ठांच्या परवानगीने वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.

Web Title: Vehicle owners, take possession of the vehicle by completing the documents