शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वरूड हादरले! निर्घृण खून करून तरुणाला पेटवले; बेसखेडा शिवारात अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळबळ

By प्रदीप भाकरे | Updated: March 29, 2026 20:15 IST

वरूड तालुक्यातील बेसखेडा शिवार रविवारी सकाळी रक्ताने माखल्याचे समोर आले आहे.

अमरावती : ​वरूड तालुक्यातील बेसखेडा शिवार रविवारी सकाळी रक्ताने माखल्याचे समोर आले आहे. एका अंदाजे ३० वर्षीय अज्ञात तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करून, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याला जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेप्रकरणी, वरूड पोलिसांनी रविवारी सायंकाळी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.                   खैरगाव (ता. नरखेड) येथील रहिवासी सुनील शंकरराव ढोमणे यांना त्यांचा पुतण्या शुभमने रविवारी सकाळी बेसखेडा शिवारातील शेताच्या नाल्याजवळ एक मृतदेह पडून असल्याची माहिती दिली. सुनील ढोमणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, त्यांना एका अज्ञात तरुणाचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील प्रेत दिसून आले. हा मृतदेह इतक्या भीषण अवस्थेत होता की, पोटातील आतड्या बाहेर आल्या होत्या आणि शरीरावरील कपडे व डोक्याचे केस पूर्णपणे जळाले होते. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने या तरुणाचा खून करून ओळख पटू नये आणि पुरावा सापडू नये, यासाठी त्याला शेताच्या नाल्यात जाळले. याप्रकरणी वरूड पोलिसांनी सुनील ढोमणे यांच्या फिर्यादीवरून खून व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली आहे.

​पोलिसांची पाच पथके रवाना

या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली आहे. स्थानिक गुन्हे शाखेची तीन आणि वरूड पोलीस स्टेशनची दोन अशी एकूण ५ विशेष पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. अंदाजे ३० वर्षे वयाच्या त्या गृहस्थाच्या पायात प्लास्टिकचे बूट, उजव्या हाताच्या बोटात स्टीलची अंगठी, तर गळ्यात लाकडी किंवा तुळशीच्या मण्यांची माळ आढळली. तेथे स्टीलची तंबाखू-चुन्याची डबी देखील आढळून आली. आपल्या भागातून या वर्णनाचा कोणताही तरुण बेपत्ता किंवा मिसिंग असेल, तर तातडीने  संपर्क साधावा, असे आवाहन अमरावती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पीआय किरण वानखडे यांनी केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Brutal Murder in Warud: Young Man Burned, Body Found

Web Summary : A 30-year-old man was brutally murdered and burned in Beskheda, Warud. Police have registered a murder case and formed five teams to investigate. The victim had distinctive jewelry, and police are seeking information about missing persons matching the description.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी