शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

चित्ता आगमनाप्रसंगी विविध इन्हेंट अन्‌ जनजागृती; वनविभागाची जोरदार तयारी

By गणेश वासनिक | Updated: September 12, 2022 17:43 IST

केंद्रीय वन मंत्रालयाचा पुढाकार; शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रचार व प्रसारावर असणार भर

अमरावती : देशात १९५२ मध्ये राजस्थान, मध्य प्रदेशातून चित्ता नामशेष झाल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले. आता तब्बल ७२ वर्षानंतर चित्ता भारतात येत आहे, त्याअनुषंगाने वनविभागाने या इव्हेंटची जोरदार तयार चालविली आहे. चित्ता हा शेडुल्ड १ च्या वन्यजीव असून, याविषयी शाळा, महाविद्यालयात जनजागृती केली जाणार आहे. प्रचार व प्रसारासासाठी वन विभाग पुढाकार घेणार आहे. 

गवताळ प्रदेशात राहणारा चित्ता हा बिबट्यासारखा दिसत असला तरी तो बिबट्या पेक्षा चपळ आणि हटके आहे. १९५२ मध्ये शेवटचा चित्ता राजस्थानातून  नष्ट झाल्याचे केंद्र शासनाने घोषीत केले होते. त्यानंतर भारतात चित्ता आणण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. सर्वोच्च न्यायालयाने सन २०२० मध्ये अफ्रिकन चित्ता भारतात आणण्याची परवानगी दिली. आता  दोन वर्षानंतर आफ्रिकन चित्ता मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पामध्ये आणून सोडणार आहे, हा प्रकल्प समृद्ध गवताळ प्रदेश असून त्या भागात आफ्रिकन चित्ता वास्तव्य करणार आहे. तेथे सोलर कुंपण करुन त्या चित्त्यावर निगराणी ठेवली जाणार आहे.जगात केवळ सात हजार चित्ते

एकेकाळी जगाच्या पाठीवर भारतात १८०० चित्त होते.  मात्र, शिकारीमुळे १९५२ मध्ये हे सर्व चित्त संपले. चित्ते हे सध्या अलगेरीया, अंगोला, बेनीन, बुकींनामध्ये आफ्रिका, इरान, केनिया, नमीबिया, निमर, टांझानीया, युगाेंडा, झिबाॅब्मे अशा १७ देशात आढळतो. हल्ली संख्या ७ हजार आहे. चित्त्यासाठी मध्य प्रदेश व राजस्थान हे प्रमुख जंगल महत्वाचे आहे. भारतात चित्ता रमला की त्याची संख्या वाढीस वेळ लागणार नाही, हे मात्र निश्चित.अनुसूचित एक मध्ये चित्ता

चित्ता हा वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ प्रमाणे अनुसूची १ मध्ये मोडतो. त्याच्या अंगावर सरळ, गोत काळे ठिपके असतात, जे बिबट्यापेक्षा वेगळे दिसतात. चित्ता हा जगातला सर्वाधिक वेगवान प्राणी असून तो प्रति ताशी ११३ किमी अंतर धाऊ शकतो, वजन केवळ ५५ किलो असते. त्याची मान बारीक असून शरीराची रचना एखाद्या आधुनिक बाईक प्रमाणे आहे. तो जंगलात साधारणत: १३ वर्षे जगु शकतो. गवताळ प्रदेशात तो चांगला रमतो.केंद्र सरकारच्या वने व पर्यावरण विभागाच्या गाईडलाईननुसार चित्त्याविषयी शाळा, महाविद्यालयात पोस्टर, जनजागृती केली जाणार आहे. चित्त्याचा ईतिहास, भारतातील जुने वास्तव आदी माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल. त्याअनुषंगाने वन विभागाने तयारी चालविली आहे. 

- सुनील लिमय, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभागAmravatiअमरावतीGovernmentसरकारenvironmentपर्यावरणforestजंगल