जिल्ह्यातील ४० केंद्रांवर विद्यार्थ्यांना आजपासून लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 05:00 IST2022-01-03T05:00:00+5:302022-01-03T05:00:55+5:30
जिल्ह्यात या वयोगटात १,४९,९५६ पात्र लाभार्थी आहेत. आतापर्यंत १८ वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरण केले जात आहे. त्यात आता या गटाची भर पडणार आहे. यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली. यामध्ये सन २००७ वा त्यापूर्वी जन्मलेले लाभार्थी पात्र ठरणार आहेत. लाभार्थ्यांना कोविन ॲपवर स्वत:च्या मोबाइल क्रमांकाद्वारे नोंदणी करता येते.

जिल्ह्यातील ४० केंद्रांवर विद्यार्थ्यांना आजपासून लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ओमायक्रॉनमुळे उद्भवणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या दक्षतेसाठी सोमवारपासून जिल्ह्यातील ४० केंद्रांवर १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. याकरिता ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. याशिवाय केंद्रांवर ऑफलाईन नोंदणीद्वारेही लसीकरण होणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
जिल्ह्यात या वयोगटात १,४९,९५६ पात्र लाभार्थी आहेत. आतापर्यंत १८ वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरण केले जात आहे. त्यात आता या गटाची भर पडणार आहे. यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली. यामध्ये सन २००७ वा त्यापूर्वी जन्मलेले लाभार्थी पात्र ठरणार आहेत. लाभार्थ्यांना कोविन ॲपवर स्वत:च्या मोबाइल क्रमांकाद्वारे नोंदणी करता येते. याशिवाय लसीकरण केंद्रांवरही नोंदणीची सुविधा राहणार आहे. या गटात केवळ कोव्हॅक्सिन लस वापरायची अनुमती शासनाने दिलेली आहे.
महापालिका क्षेत्रात सबनीस प्लॅाट, विलासनगर, बिच्छुटेकडी, बडनेराचे हरिभाऊ वाठ केंद्र व आयसोलेशन दवाखाना या केंद्रांवर लस दिली जाणार आहे. १० जानेवारीपासून ७१ हजार ९६३ ज्येष्ठ नागरिकांसह फ्रंट लाईन वर्कर व हेल्थ केअर वर्करला बूस्टर डोस दिले जाणार आहे.
महापालिका क्षेत्रातील कोव्हॅक्सिनच्या पाच केंद्रांवर १५ ते १८ वर्षे वयोगटात लसीकरण होईल, यासाठी २ जानेवारीपासून ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे.
- डॉ. विशाल काळे
वैद्यकीय आरोग्य अधिकारी