शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या कारागृहात रिक्त पदांचे ग्रहण सुटेना.. अंतर्गत सुरक्षा धोक्यात, कैद्यांच्या संख्येत बेसुमार वाढ

By गणेश वासनिक | Updated: September 29, 2022 16:53 IST

गृह विभागाचे (अपील, सुरक्षा) नवे प्रधान सचिव शाम तागडे यांनी स्वीकारली पदाची सूत्रे, वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त

अमरावती : राज्याच्या कारागृहांमध्ये वरिष्ठ अधिकारी ते शिपाई पदापर्यंत अनेक पदे रिक्त आहेत. मात्र, कारागृह प्रशासनाकडे कोणी फारशे लक्ष देत नाही. त्यामुळे कारागृहांची अंतर्गत सुरक्षा धोक्यात आल्याचे चित्र आहे. परंतु, गृह विभागाचे (अपील, सुरक्षा) नवे प्रधान सचिव शाम तागडे यांनी पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. तागडे हे विदर्भाचे सुपूत्र असून, त्यांना कारागृहाच्या रिक्त पदांसह पदोन्नतीचा विषय नियोजनबद्ध पद्धतीने हाताळावा लागणार आहे.

राज्याच्या मध्यवर्ती कारागृहाच्या ९ पैकी ७ कारागृहांमध्ये अधीक्षकपदी कायमस्वरूपी अधिकारी नाही. सात जागांवर प्रभारी कामकाज सुरू आहे. परिणामी मध्यवर्ती कारागृहाच्या अंतर्गत सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहे. कारागृह पूर्व विभाग, नागपूरच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची पुणे विभागात बदली झाली आहे. परंतु, साठे यांच्याकडे पुणे, नागपूर अशा दोन्ही कारागृह विभागाचा हेविवेट कारभार आहे.

डीआयजी मुख्यालय पुणे, कारागृह मध्य विभाग औरंगाबाद आणि पूर्व विभाग नागपूर येथे डीआयजी पदी पात्र अधिकाऱ्यांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर जेलरची १०० पदे रिक्त असून, त्यापैकी  ४० पदांचा अनुशेष एकट्या विदर्भात आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलडाणा, यवतमाळ जिल्हा कारागृहाच्याअधीक्षकांच्या बदल्यांचा कालावधी होऊनही फाईल प्रलंबित आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भाचे सुपूत्र असून, त्यांच्या सोबतीला गृह विभागाचे प्रधान सचिव शाम तागडे हेदेखील विदर्भाचेच आहेत. त्यामुळे राज्याच्या कारागृहात रिक्त पदांचे ग्रहण, पदाेन्नतीचा प्रश्न मार्गी लागेल, अशी शक्यता आहे. मुंबईत २२ वर्षानंतर ‘जेल कॅडर’ची वर्णी

कारागृह विभाग मुंबईच्या कारागृह उपमहानिरीक्षकपदी तब्बल २२ वर्षानंतर योगेश देसाई यांची वर्णी लागली आहे. अगोदर मुंबई विभागात आयपीएस अधिकाऱ्यांची डीआयजीपदी वर्णी व्हायची. मात्र, आता योगेश देसाई यांच्या रूपाने २२ वर्षानंतर ‘जेल कॅडर’ ची वर्णी लागली आहे. देसाई यांच्याकडे औरंगाबाद डीआयजीच्या सुद्धा प्रभार आहे. मुंबई कारागृह विभागाच्या अधिनस्थ मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, सिंधुदूर्ग आदी भाग येतो. तागडे यांच्यापुढे तीन महिने चॅलेजिंग

गृह विभागाचे (अपील, सुरक्षा) नवे प्रधान सचिव शाम तागडे हे डिसेंबर २०२२ मध्ये सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे कारागृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, पदोन्नती, अधीक्षकांची वर्णी, जेलरची पदभरती यासह रिक्त जागांवर नव्या नियुक्ता कराव्या लागणार आहे. मध्यवर्ती कारागृहाच्या सात अधीक्षक पदांसाठी पात्र १२ जणांचे अर्ज मागविले आहे. एकंदरीत प्रलंबित फाईलींचा निपटारा शाम तागडे यांना येत्या तीन महिन्यात करावा लागणार आहे. त्यांच्यासाठी पुढील तीन महिने चॅलेजिंग असणार आहे.

टॅग्स :jailतुरुंगPrisonतुरुंगGovernmentसरकारPoliceपोलिस