जपून वापरा सोशल मीडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 06:00 IST2020-01-04T06:00:00+5:302020-01-04T06:00:33+5:30

अमरावती शहर पोलीस व सायबर सेलतर्फे ‘सायबर सेफ वूमेन’ या मोहिमेत आयोजित कार्यशाळा शुक्रवारी विमलाबाई देशमुख सभागृहात पार पडली, याप्रसंगी बाविस्कर बोलत होते. प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सायबर सुरक्षेबाबत आवाहन प्रसारित करण्यात आले.

Use social media carefully | जपून वापरा सोशल मीडिया

जपून वापरा सोशल मीडिया

ठळक मुद्देसंजयकुमार बाविस्कर : महिला सुरक्षेची जागर मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सोशल मीडिया हाताळताना प्रत्येकाने लक्ष्मणरेषा आखून घेणे आवश्यक आहे. सतत सजगता हाच सुरक्षिततेचा उपाय आहे. सायबर सुरक्षिततेचा हा संदेश प्रत्येक माता-भगिनीपर्यंत पोहोचवा, असे आवाहन शहर पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी केले.
अमरावती शहर पोलीस व सायबर सेलतर्फे ‘सायबर सेफ वूमेन’ या मोहिमेत आयोजित कार्यशाळा शुक्रवारी विमलाबाई देशमुख सभागृहात पार पडली, याप्रसंगी बाविस्कर बोलत होते. प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सायबर सुरक्षेबाबत आवाहन प्रसारित करण्यात आले. यावेळी उपमहापौर कुसुम साहू, महिला व बालकल्याण सभापती वंदना हरणे, सुनीता भेले, सुरेखा लुंगारे, प्राचार्य स्मिता देशमुख, माहिती उपसंचालक राधाकृष्ण मुळी, दिशा संस्थेच्या ज्योती खांडपासोळे, पोलीस उपायुक्त प्रशांत होळकर, शशिकांत सातव, सहायक पोलीस आयुक्त सुहास भोसले आदी उपस्थित होते. यावेळी चाइल्ड लाइनचे दिनेश कपूर यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. पोलीस निरीक्षक नीलिमा आरज यांनी प्रास्ताविक, पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर यांनी संचालन केले, तर जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी आभार मानले. सहायक पोलीस निरीक्षक हेरोळे यांच्यासह विविध पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आयोजनाकरिता परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला महिला कार्यकर्ता, विद्यार्थिनी, अधिकारी उपस्थित होते.

आक्षेपार्ह पोस्टविषय पोलिसांना कळवा
दुर्लक्ष वा चुकीच्या बाबी सहन करीत राहण्याची वृत्ती टाळून कुठलीही आक्षेपार्ह बाब लक्षात येताच तात्काळ पोलिसांना कळवावे. समाज माध्यमे हाताळताना अनोळखी व्यक्तींना फ्रेंड लिस्टमध्ये स्थान देता कामा नये. शेअर केलेली माहिती, फोटोला अधिक लाईक मिळण्याची भुरळ पडू देऊ नये. कारण गैरहेतूने जवळीक साधण्याचाही प्रयत्न गुन्हेगारी व्यक्तींकडून केला जातो. त्यामुळे वेबसाइटच्या सेंटिंग्जमध्ये जाऊन सिक्युरिटीचे भक्कम पर्याय निवडणे, अनावश्यक माहिती शेअर न करणे, बॅकअप ठेवणे व पालकांचे नियंत्रण गरजेचे आहे, अशी माहिती सायबरचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली.

सायबर सेलचे पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशन
दुसºया सत्रात सायबर सेलचे निरीक्षक प्रवीण काळे व ज्योती खांडपासोळे यांनी कार्यशाळेत पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे सायबर सुरक्षा व सार्वजनिक सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. सायबर ग्रुमिंग, सायबर बुलिंग, मॉर्फिंग, सायबर डिफेमेशन, स्टॉकिंग, आॅनलाइन गेमिंग, फिशिंग, सेक्सॉर्टशन, स्कूटिंग अशा विविध सायबर गुन्हे प्रकारांची माहिती दिली.

Web Title: Use social media carefully

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.