शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

बीटीमध्ये विनापरवानगी जीन, चौकशीसाठी ‘एसआयटी’ गठित, एक महिन्याच्या आता अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 4:45 PM

बीटी कपासीच्या बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले व तणनाशकाला सहनशील असलेले (ट्रॉस्जेस्टिक हरबिसाइड ग्लॉयकोसेट टॉलरन्स ट्रेट) जीन वापरून अनेक बियाणे उत्पादक कंपन्यांनी अवैध बियाण्यांचे उत्पादन व विक्री केल्याची बाब निदर्शनात आली असून, चौकशीसाठी शासनाने बुधवारी उशिरा दोन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) गठित केले आहे.

अमरावती : बीटी कपासीच्या बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले व तणनाशकाला सहनशील असलेले (ट्रॉस्जेस्टिक हरबिसाइड ग्लॉयकोसेट टॉलरन्स ट्रेट) जीन वापरून अनेक बियाणे उत्पादक कंपन्यांनी अवैध बियाण्यांचे उत्पादन व विक्री केल्याची बाब निदर्शनात आली असून, चौकशीसाठी शासनाने बुधवारी उशिरा दोन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) गठित केले आहे. समिती तपास व चौकशीअंती एक महिन्याच्या आत अहवाल शासनाला सादर करणार आहे.राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त संजय बर्वे हे विशेष तपास पथकाचे अध्यक्ष, तर अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे हे समितीचे सदस्य सचिव आहेत. बीटी बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले व तणनाशकाला सहनशील जनुकांचा वापर करून अनेक कंपन्यांद्वारा बियाण्यांचे उत्पादन व विक्री होत असल्याच्या तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या तसेच नागपूरच्या सीआयसीआर  या केंद्राच्या संस्थेकडून प्राप्त अहवालानुसार, जादू, एटीएम, बलभद्र, अर्जुन व कृष्णा गोल्ड या बियाण्यांमध्ये हे जनुक आढळून आले. यामुळे पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या नियमांचे उल्लंघन झालेले आहे. अशाच प्रकारच्या बियाण्यांचे उत्पादन अनेक राज्यात अनधिकृतपणे होत असल्याचे शासनाच्या निदर्शनात आले. यासंदर्भात २५ आॅक्टोबरला नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी येथे ‘एफआयआर’देखील दाखल झालेला आहे. अशाप्रकारे बियाणे उत्पादन करणारी टोळीच अनेक राज्यात कार्यरत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे सीबीआय चौकशीची मागणी १३ आॅक्टोबर २०१७ ला केली होती. त्याअनुषंगाने राज्य शासनानेदेखील स्वतंत्र तपासासाठी आता विशेष तपास समितीचे गठन करून एक महिन्याच्या आत अहवाल मागविला आहे.

अशी आहे समितीची कार्यकक्षामोन्सँटो, महिको व मोन्सँटो होल्डींग्ज या बियाणे कंपन्याव काही अनधिकृत कंपन्या विनापरवाना जनुक वापरून महाराष्ट्रात अनधिकृतपने उत्पादन, साठवणूूक व विक्री यामधील सहभाग व भूमिकेची चौकशी करणे, याप्रकरणी दोषी कंपन्यांवर कारवाई करण्याबाबत शासनाला शिफारस करणे, दाखल गुन्हासंदर्भात कागदपत्राची चाचनी करून अहवाल सादर करणे, बियाण्यांच्या अवैध विक्रीसाठी कारनीभूत बाबी निश्चित करून प्रतिबंधात्मक शिफारस देणे व भविष्यात ाश्या घटनांची पुनरावृत्ती होवू नये यासाठी शिफारसकरून शासनाला एक महिण्याच्या आत अहवाल देणे आदी समितीची कार्यकक्षा आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती