विद्यापीठाचा परीक्षा विभाग फेसबुकवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 05:00 IST2021-11-03T05:00:00+5:302021-11-03T05:00:42+5:30
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून परिक्षेत्रातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम जिल्ह्रांतील सर्व महाविद्यालयांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे, त्यांचे निकाल लावणे, तसेच इतर परीक्षाविषयक कामे केली जातात. याची माहिती विद्यार्थ्यांना तातडीने मिळावी, याकरिता परीक्षा मंडळाच्या निर्णयानुसार विद्यापीठाचे स्वतंत्र फेसबुक अकाउंट सुरू झाले आहे. या अकाउंटद्वारे इतरही आवश्यक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविली जाईल. फेसबुकची लिंक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

विद्यापीठाचा परीक्षा विभाग फेसबुकवर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्यापरीक्षा मंडळाच्या फेसबुक अकाउंटचे कुलगुरू दिलीप मालखेडे यांनी बटन दाबून मंगळवारी उद्घाटन केले. यावेळी कुलसचिव तुषार देशमुख, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख, जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर, सहायक कुलसचिव राहुल नरवाडे आदी उपस्थित होते.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून परिक्षेत्रातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम जिल्ह्रांतील सर्व महाविद्यालयांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे, त्यांचे निकाल लावणे, तसेच इतर परीक्षाविषयक कामे केली जातात. याची माहिती विद्यार्थ्यांना तातडीने मिळावी, याकरिता परीक्षा मंडळाच्या निर्णयानुसार विद्यापीठाचे स्वतंत्र फेसबुक अकाउंट सुरू झाले आहे. या अकाउंटद्वारे इतरही आवश्यक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविली जाईल. फेसबुकची लिंक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय सर्व संलग्नित महाविद्यालयांनासुद्धा पाठविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाने सुरू केलेल्या फेसबुक अकाउंटला जॉईन करावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी केले आहे.