शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ स्वीकारणार आता ऑनलाईन तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:01 IST

अमरावती विद्यापीठाचे शैक्षणिक जाळे अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात विस्तारलेले आहे. ३९५ महाविद्यालयांत पाच लाख विद्यार्थी एकूणच शैक्षणिक शाखांमध्ये अभ्यासक्रमात शिक्षण घेतात. परिणामी विद्यार्थ्यांना जुजबी कामानिमित्त विद्यापीठात ये-जा करावी लागते. मात्र, प्रशासनाने विद्यापीठाशी संबंधित कामानिमित्त विद्यार्थ्यांना येण्याची गरज भासू नये, यासाठी ऑनलाईन तक्रारी हा नवा उपक्रम प्रस्तावित केला आहे.

ठळक मुद्देऑफलाईनला ब्रेक : विद्यार्थ्यांना विद्यापीठात येण्याची गरज नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संबंधित समस्या, तक्रार असल्यास ती आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन सोडविता येणार आहे. त्याकरिता विद्यापीठाने अर्जाचा नमुना तयार केला आहे. अर्जाचा नमुना व्हॉट्सअ‍ॅपवर टाकावा लागणार आहे. आठ दिवसांत विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण होईल, अशी यंत्रणा प्रशासनाकडून उभारली जात आहे. ‘लॉकडाऊन’ नंतर याची अंमलबजावणी होणार आहे. ऑफलाईन तक्रारी स्वीकारल्या जाणार नाही, ही बाब विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केली आहे.अमरावती विद्यापीठाचे शैक्षणिक जाळे अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात विस्तारलेले आहे. ३९५ महाविद्यालयांत पाच लाख विद्यार्थी एकूणच शैक्षणिक शाखांमध्ये अभ्यासक्रमात शिक्षण घेतात. परिणामी विद्यार्थ्यांना जुजबी कामानिमित्त विद्यापीठात ये-जा करावी लागते. मात्र, प्रशासनाने विद्यापीठाशी संबंधित कामानिमित्त विद्यार्थ्यांना येण्याची गरज भासू नये, यासाठी ऑनलाईन तक्रारी हा नवा उपक्रम प्रस्तावित केला आहे. ऑनलाईन तक्रारीसाठी विद्यापीठ व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक देणार आहे. दरदिवशी या क्रमांकावर आलेल्या तक्रारींचे दुपारी १२.३० वाजता प्रिंटआऊड काढण्यात येणार आहे. प्राप्त तक्रारींची नोंद घेत विभागनिहाय ती सहायक कुलसचिवांकडे पाठविली जाणार आहे. त्यानंतर ज्या टेबलवर ही तक्रार आहे, त्या कर्मचाऱ्यांकडे ही कामे सुपूर्द केले जाईल. दुसऱ्या दिवसापासून प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू होईल. विद्यार्थ्यांनी पाठविलेली तक्रार, अडचण सोडविताना सदर कर्मचाऱ्यांना काही अडथळा आल्यास विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्याचे निरसन करण्यात येईल. या तक्रारीबाबतची अंतिम कार्यवाही सहायक कुलसचिव हे पुढे प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांच्याकडे पाठवतील. प्र-कुलगुरू यांनी क्रॉस चेकिंग केल्यानंतर तक्रारकर्त्या विद्यार्थ्यांना पुन्हा ऑनलाईन माहिती पाठविली जाईल, असे या नव्या प्रस्तावाचे स्वरूप असणार आहे.अशी करावी लागेल ऑनलाईन तक्रारविद्यार्थ्यांना ऑनलाईन तक्रार करताना कोऱ्या कागदावर स्वलिखित अर्ज करावा लागणार आहे. यात विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, महाविद्यालयाचे नाव, वर्गवारी (नियमित, माजी, बहि:शाल), परीक्षेचे नाव, परीक्षेचे वर्ष, संबंधित परीक्षेचा क्रमांक, परीक्षा केंद्राचे नाव, अडचणी तथा त्रुटीचे स्वरूप मोजक्याच शब्दांत आवश्यक, मोबाइल क्रमांक, व्हॉट्सअ‍ॅप असणे अनिवार्य करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन तक्रारीबाबत प्रस्ताव आहे. कुलगुरूंची स्वाक्षरी व्हायची आहे. लॉकडाऊननंतर यावर अंमलबजावणी होईल. यापुढे कोणत्याही विद्यार्थ्यांना विद्यापीठ संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने येण्याची आवश्यकता नाही. आता ऑफलाईन तक्रार स्वीकारली जाणार नाही.- हेमंत देशमुख, संचालक,परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ

टॅग्स :universityविद्यापीठ