विद्यापीठ स्वीकारणार आता ऑनलाईन तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:01 IST2020-04-27T05:00:00+5:302020-04-27T05:01:08+5:30

अमरावती विद्यापीठाचे शैक्षणिक जाळे अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात विस्तारलेले आहे. ३९५ महाविद्यालयांत पाच लाख विद्यार्थी एकूणच शैक्षणिक शाखांमध्ये अभ्यासक्रमात शिक्षण घेतात. परिणामी विद्यार्थ्यांना जुजबी कामानिमित्त विद्यापीठात ये-जा करावी लागते. मात्र, प्रशासनाने विद्यापीठाशी संबंधित कामानिमित्त विद्यार्थ्यांना येण्याची गरज भासू नये, यासाठी ऑनलाईन तक्रारी हा नवा उपक्रम प्रस्तावित केला आहे.

The university will now accept online complaints | विद्यापीठ स्वीकारणार आता ऑनलाईन तक्रारी

विद्यापीठ स्वीकारणार आता ऑनलाईन तक्रारी

ठळक मुद्देऑफलाईनला ब्रेक : विद्यार्थ्यांना विद्यापीठात येण्याची गरज नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संबंधित समस्या, तक्रार असल्यास ती आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन सोडविता येणार आहे. त्याकरिता विद्यापीठाने अर्जाचा नमुना तयार केला आहे. अर्जाचा नमुना व्हॉट्सअ‍ॅपवर टाकावा लागणार आहे. आठ दिवसांत विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण होईल, अशी यंत्रणा प्रशासनाकडून उभारली जात आहे. ‘लॉकडाऊन’ नंतर याची अंमलबजावणी होणार आहे. ऑफलाईन तक्रारी स्वीकारल्या जाणार नाही, ही बाब विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केली आहे.
अमरावती विद्यापीठाचे शैक्षणिक जाळे अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात विस्तारलेले आहे. ३९५ महाविद्यालयांत पाच लाख विद्यार्थी एकूणच शैक्षणिक शाखांमध्ये अभ्यासक्रमात शिक्षण घेतात. परिणामी विद्यार्थ्यांना जुजबी कामानिमित्त विद्यापीठात ये-जा करावी लागते. मात्र, प्रशासनाने विद्यापीठाशी संबंधित कामानिमित्त विद्यार्थ्यांना येण्याची गरज भासू नये, यासाठी ऑनलाईन तक्रारी हा नवा उपक्रम प्रस्तावित केला आहे. ऑनलाईन तक्रारीसाठी विद्यापीठ व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक देणार आहे. दरदिवशी या क्रमांकावर आलेल्या तक्रारींचे दुपारी १२.३० वाजता प्रिंटआऊड काढण्यात येणार आहे. प्राप्त तक्रारींची नोंद घेत विभागनिहाय ती सहायक कुलसचिवांकडे पाठविली जाणार आहे. त्यानंतर ज्या टेबलवर ही तक्रार आहे, त्या कर्मचाऱ्यांकडे ही कामे सुपूर्द केले जाईल. दुसऱ्या दिवसापासून प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू होईल. विद्यार्थ्यांनी पाठविलेली तक्रार, अडचण सोडविताना सदर कर्मचाऱ्यांना काही अडथळा आल्यास विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्याचे निरसन करण्यात येईल. या तक्रारीबाबतची अंतिम कार्यवाही सहायक कुलसचिव हे पुढे प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांच्याकडे पाठवतील. प्र-कुलगुरू यांनी क्रॉस चेकिंग केल्यानंतर तक्रारकर्त्या विद्यार्थ्यांना पुन्हा ऑनलाईन माहिती पाठविली जाईल, असे या नव्या प्रस्तावाचे स्वरूप असणार आहे.

अशी करावी लागेल ऑनलाईन तक्रार
विद्यार्थ्यांना ऑनलाईन तक्रार करताना कोऱ्या कागदावर स्वलिखित अर्ज करावा लागणार आहे. यात विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, महाविद्यालयाचे नाव, वर्गवारी (नियमित, माजी, बहि:शाल), परीक्षेचे नाव, परीक्षेचे वर्ष, संबंधित परीक्षेचा क्रमांक, परीक्षा केंद्राचे नाव, अडचणी तथा त्रुटीचे स्वरूप मोजक्याच शब्दांत आवश्यक, मोबाइल क्रमांक, व्हॉट्सअ‍ॅप असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन तक्रारीबाबत प्रस्ताव आहे. कुलगुरूंची स्वाक्षरी व्हायची आहे. लॉकडाऊननंतर यावर अंमलबजावणी होईल. यापुढे कोणत्याही विद्यार्थ्यांना विद्यापीठ संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने येण्याची आवश्यकता नाही. आता ऑफलाईन तक्रार स्वीकारली जाणार नाही.
- हेमंत देशमुख, संचालक,
परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ

Web Title: The university will now accept online complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.