तळेगाव ठाकूर फाट्यावर दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:14 IST2021-09-27T04:14:28+5:302021-09-27T04:14:28+5:30

तिवसा : तळेगाव ठाकूर येथून तिवसाकडे येत असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार पती व ...

An unidentified vehicle hit a two-wheeler at Talegaon Thakur fork | तळेगाव ठाकूर फाट्यावर दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक

तळेगाव ठाकूर फाट्यावर दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक

तिवसा : तळेगाव ठाकूर येथून तिवसाकडे येत असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार पती व पत्नी गंभीर जखमी झाले, तर मुलगा किरकोळ जखमी झाला. ही घटना २६ सप्टेंबर रोजी सकाळी घडली.

पोलीस सूत्रांनुसार, संदीप उत्तमराव बेलसरे (४०), शुभांगी संदीप बेलसरे (३०) व सोहम बेलसरे(वय १४), रा. सर्व तळेगाव ठाकूर असे अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. हे तिघेही सकाळी दुचाकीने तळेगाव ठाकूर येथून तिवसाकडे येत तळेगाव ठाकूर फाट्यासमोर राष्ट्रीय महामार्गाने तिवसाकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. यात तिघेही दूरवर फेकले गेले. काही नागरिकांनी तिवसा ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल केले व त्यानंतर पुढील उपचारासाठी अमरावती येथे खासगी रुग्णालयात नेण्यात आले. अपघातानंतर अज्ञात चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पलायन केले.

Web Title: An unidentified vehicle hit a two-wheeler at Talegaon Thakur fork