दुचाकी अनियंत्रित, तिघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:25 IST2021-02-21T04:25:37+5:302021-02-21T04:25:37+5:30

मोर्शी : भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन कलंडत गेल्याने झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले. पैकी एकाला गंभीर अवस्थेत अमरावती जिल्हा ...

Uncontrolled bike, three seriously injured | दुचाकी अनियंत्रित, तिघे गंभीर जखमी

दुचाकी अनियंत्रित, तिघे गंभीर जखमी

मोर्शी : भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन कलंडत गेल्याने झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले. पैकी एकाला गंभीर अवस्थेत अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मोर्शी ते चांदूरबाजार मार्गावरील ममदापूर येथे २० फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

विवेक अशोकराव ठाकरे (३०, रा. चिंचोली गवळी) हा दुचाकी चालवत होता. तर, अभिषेक संजय खडसे (१५) व गोलू सरजू धुर्वे (१५) हे मागे बसले होते. भरधाव दुचाकी अचानक स्लिप झाली. त्यात तिघेही दुचाकीसह फरफटत गेले. तिन्ही जखमींना नागरिकांनी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, मोर्शी येथे आणले. तर, विवेक ठाकरे याला जबर मार लागल्याने त्याला अमरावतीला हलविण्यात आले.

Web Title: Uncontrolled bike, three seriously injured