बॅटने मारहाण करून मामांनीच केला भाचीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:15 IST2021-01-03T04:15:13+5:302021-01-03T04:15:13+5:30
फ्रेजरपुरा पोलिसानी नोंदविला दोघांवर गुन्हा : संपतीचा वाद अमरावती : संपत्तीच्या वादातून आजोबांकडे आलेल्या भाचीला व बहिणीला बॅटने मारहाण ...

बॅटने मारहाण करून मामांनीच केला भाचीचा विनयभंग
फ्रेजरपुरा पोलिसानी नोंदविला दोघांवर गुन्हा : संपतीचा वाद
अमरावती : संपत्तीच्या वादातून आजोबांकडे आलेल्या भाचीला व बहिणीला बॅटने मारहाण करून भाचीचे कपडे फाडून तिचा दोन मामांनी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना जयस्वाल चक्कीजवळ फ्रेजरपुरा येथे शनिवारी दुपारी घडली. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी दोन्ही मामांविरुद्ध गुन्हा नोंदविला.
पोलीस सूत्रानुसार, आनंद जयस्वाल, अतुल जयस्वाल, दोन्ही रा. फ्रेजरपुरा, एका महिला असे आरोपीचे नाव आहे. तक्रारकर्ता फिर्यादी २२ वर्षीय भाची ही दहीसर मुंबई येथे राहते. ती आईसोबत एका महिन्यापूर्वी आजोबाकडे आली. याच ठिकाणी दोन्ही मामा राहतात. बहीण व भावांमध्ये संपत्तीचा वाद असल्याचे पोलिसांनी सांगितले. संपतीच्या वादातून शनिवारी भांडण झाले. त्यानंतर दोन्ही मामांनी बहीण व भाचीला बॅटने मारहाण केली. तसेच भाचीचे कपडे फाडून तिचा विनयभंग केला. मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंविची कलम ३५४, ३५४(ब), ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. त्यांचा गत सहा वर्षापासून वाद सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.