शहरं
Join us  
Trending Stories
1
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
2
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
5
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
6
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
7
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
8
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
9
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
10
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
11
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
12
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
13
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
14
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
15
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
16
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
17
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
18
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
19
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
Daily Top 2Weekly Top 5

तलाईत विनापरवानगी १९ साग वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:32 IST

धारणी : येथील तलाई अंतर्गत येत असलेल्या शेत सर्व्हे नंबर ३५ ब या जमिनीचे प्रकरण उपविभागीय अधिकारी कार्यालयात न्यायर्थ ...

धारणी : येथील तलाई अंतर्गत येत असलेल्या शेत सर्व्हे नंबर ३५ ब या जमिनीचे प्रकरण उपविभागीय अधिकारी कार्यालयात न्यायर्थ प्रलंबित आहे. यादरम्यान जमिनीचे मूळ मालक शेख बशीर शेख लाल यांनी या जमिनीवर साग वृक्षांची अवैध कत्तलीची तक्रार धारणी येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे केली आहे. वृक्षतोडीची परवानगी देणाऱ्या आदेशाची प्रत त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे माहिती अधिकारांतर्गत मागितली. पण, अशी कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.

शेख बशीर शेख लाल यांनी प्रकरणातील गैरअर्जदारांनी शेतामधील १९ सागवृक्ष परस्पर कापून विकल्याची तक्रार नोंदविली होती. त्याअनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील वर्तुळ अधिकाऱ्यांनी सदर शेतामधील वृक्षतोड झालेल्या खोडांचा पंचनामा केला. मात्र, पुढे हे प्रकरण थंडबस्त्यात टाकण्यात आले.

याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी १९ सागवृक्ष कापण्याची परवानगी वनविभागाकडून देण्यात आली नसल्याचे सिद्ध झाल्यानंतरही वनविभागाकडून वनगुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. त्यामुळे शेख बशीर शेख लाल यांनी धारणी येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे संबंधितांविरुद्ध वनगुन्हा कायम करण्याबाबत विनंती केली आहे. याप्रकरणी सविस्तर चौकशीअंती योग्य कारवाई करण्याचे आश्वासन वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली आहे.

एकीकडे उपविभागीय अधिकारी कार्यालयातून संबंधित जमिनीवरील खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद करण्यात आले. दुसरीकडे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांचे आदेशान्वये खोटे फेरफार प्रकरणाचीसुद्धा चौकशी पोलिसांकडे सोपविण्यात आली आहे. अशातच वनविभागाकडे सुद्धा अवैध वृक्षतोडीचे प्रकरण दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधितांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे.