शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

राज्यातील विद्यापीठांना यूजीसीच्या गाईडलाईनची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 7:18 PM

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांच्या उन्हाळी २०२० परीक्षा रखडल्या आहेत. देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू झाले आहे. परीक्षांसंदर्भात नेमके काय करावे, हे अद्याप विद्यापीठांनी ठरविलेले नाहीत. आता सर्वच विद्यापीठांना परीक्षांबाबत केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) गाईडलाईनची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देराज्यभरात विद्यापीठांच्या उन्हाळी परीक्षा रखडल्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांच्या उन्हाळी २०२० परीक्षा रखडल्या आहेत. देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू झाले आहे. परीक्षांसंदर्भात नेमके काय करावे, हे अद्याप विद्यापीठांनी ठरविलेले नाहीत. आता सर्वच विद्यापीठांना परीक्षांबाबत केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) गाईडलाईनची प्रतीक्षा आहे.विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांमध्ये दरवर्षी उन्हाळी परीक्षांचे नियोजन एप्रिलमध्ये करण्यात येते. तथापि, लॉकडाऊन, संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांचे कामकाज ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. महाविद्यालयांमध्येही शुकशुकाट आहे. परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना चिंता वाटू लागली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने उन्हाळी २०२० परीक्षा १५ एप्रिलपासून घेण्याचे नियोजन चालविले होते. त्यानुसार, ३९४ महाविद्यालयांना परीक्षांचे वेळापत्रक कळविलेले होते. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असल्याने विद्यापीठांना उन्हाळी परीक्षांबाबत काय करावे, हे अद्याप कळू शकले नाही. काही दिवसांपूर्वी राज्याचे उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांनी विद्यापीठांकडून परीक्षांची तयारी, तारखेबाबत माहिती मागविली होती. मात्र, देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षांसंदर्भात धाकधूक वाढली आहे. सर्वच विद्यापीठांच्या कुलगुरुंना यूजीसीच्या गाईडलाईनची प्रतीक्षा आहे.राज्यात या अकृषी विद्यापीठांना परीक्षांची चिंतामुंबई विद्यापीठ, मुंबई, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. बाबाासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, सोलापूर विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्र्वविद्यालय, रामटेक, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांना परीक्षांची चिंता सतावत आहे.लॉकडाऊनमुळे परीक्षांचा कालावधी वाढेल, यात दुमत नाही. मात्र, राज्यभरात विद्यापीठांमध्ये समान स्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. परंतु, उन्हाळी परीक्षाविषयी कोणता निर्णय घ्यावा, त्याकरिता यूजीसीच्या गाईडलाईनची प्रतीक्षा आहे.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ

 

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र