कार-दुचाकी अपघातात दोन युवक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 19:34 IST2020-02-29T19:33:42+5:302020-02-29T19:34:42+5:30
कारचेही मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळाल्यावर राजापेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले.

कार-दुचाकी अपघातात दोन युवक गंभीर
अमरावती : कार आणि दुचाकी अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना बडनेराच्या जुना बायपास मार्गावर शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली. पोलीस सूत्रांनुसार अमरावतीच्या पूजा कॉलनीतील धीरज अशोक वडुरकर (२०) आणि जयरामनगरातील आकाश राजेश राईकवार (२०) अशी जखमींची नावे आहेत. दोन्ही युवक बडनेराकडे दुचाकी (एमएच २७ झेड १५८१) ने जात असताना विरुद्ध दिशेने येणाºया कार (एमएच २७ बीव्ही ७२७) शी धडक झाली. धडक जोरदार होती. दुचाकी चकनाचूर झाली.
कारचेही मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळाल्यावर राजापेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले. रस्त्यावरून ये-जा करणाºयांनी घटनास्थळी गर्दी केली असली तरी जखमींना तातडीने उपचारार्थ नेण्याऐवजी बहुतांश मंडळी चित्रीकरणात गुंतली राहिली. सायंकाळी वृत्त लिहिस्तोवर या अपघाताची पोलिसांत कुण्याही पक्षाकडून तक्रार नोंदविण्यात आली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही. खासगी माहितीनुसार, जखमींना दोन वेगवेगळ्या अद्ययावत रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.