दोन वर्षाच्या चिमुकलीचा वाचविला जीव; घशात अडकलेले एक रुपयाचे नाणे काढले बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 12:44 IST2021-08-24T12:43:46+5:302021-08-24T12:44:42+5:30

Amravati News घरात खेळत असताना आपल्या चिमुकलीनी तोंडात काही तरी टाकले व ते घशात अडकले असल्याचे वडिलांच्या लक्षात आले. .

Two-year-old girl's life saved; A rupee seal stuck in the throat was taken out | दोन वर्षाच्या चिमुकलीचा वाचविला जीव; घशात अडकलेले एक रुपयाचे नाणे काढले बाहेर

दोन वर्षाच्या चिमुकलीचा वाचविला जीव; घशात अडकलेले एक रुपयाचे नाणे काढले बाहेर

डॉ. मनीष अप्ततूरकर यांचा यशस्वी प्रयत्न

मोहन राऊत

अमरावती: घरात खेळत असताना आपल्या चिमुकलीनी तोंडात काही तरी टाकले व ते घशात अडकले असल्याचे वडिलांच्या लक्षात आले मात्र तो एक्सरे मध्ये एक रुपयाचा शिक्का असल्याचे आढळले शहरातील सर्वज्ञ हॉस्पिटलचे डॉ मनीष अप्ततूरकर यांनी हा शिक्का यशस्वीरित्या काढून दोन वर्षाच्या चिमुकलीचा जीव वाचविला आहे.

तालुक्यातील येरली येथील माही सतीश भवारकर (२) ही सकाळी घरी खेळत असताना तिने तोंडात काहीतरी टाकल्याचे वडिलाच्या लक्षात आले. त्यांनी लगेच धामणगाव येथील सर्वज्ञ हॉस्पिटलचे संचालक मनीष अप्ततूरकर यांच्या दवाखान्यात आणले. त्यांनी त्या मुलीच्या घशाचा एक्स घेतला असता, एक रुपयाचा शिक्का घशात अडकला असल्याचे दिसले.

डॉ. अप्ततूरकर यांचे लहान बालकांच्या आरोग्यविषयक असलेले ज्ञान व अनुभव तसेच वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी प्रथम घशात कॅथेटर टाकून आत फुगा फुगविला. त्यात हा शिक्का अडकून बाहेर काढला. अमरावती, यवतमाळ येथे आधुनिक तंत्रज्ञानाचे साहित्य आहे. मात्र, धामणगाव सारख्या शहरातील असे साहित्य उपलब्ध नसतानाही डॉ. मनीष अप्ततूरकर यांनी चिमुकलीच्या घशातून शिक्का काढल्याने त्यांचे वैद्यकीय क्षेत्रात कौतुक होत आहे.

Web Title: Two-year-old girl's life saved; A rupee seal stuck in the throat was taken out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य