शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कौंडण्यपूर फाट्यावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या; दोन ठार, तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 15:54 IST

तिघे जखमी असून त्यांच्यावर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देजखमींमध्ये चिमुकल्यांचाही समावेश

कुऱ्हा (अमरावती) : कुऱ्हा ते कौंडण्यपूर फाट्यावर दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत दोन ठार तर तीनजण जखमी झाले. जखमींमध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे. १८ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते ८च्या सुमारास हा अपघात घडला.

पुरूषोत्तम नारायण गांधी (६०, रा. खरांगणा, ता. आर्वी, जि. वर्धा) व प्रवीण श्रीराम आडे (३५, रा. कारला, ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती) अशी अपघातातील मृतांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत प्रवीण यांच्या आई सुभा श्रीराम आडे (५५ ), वंश प्रवीण आडे ( ७ वर्षे ) यशवंत प्रवीण आडे (५ वर्षे सर्व रा. कारला) हे तिघे जखमी असून त्यांच्यावर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रवीण आडे हे आई व दोन लहान मुलांसह जवळच्या मारडा गावात रविवारी झालेल्या लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. लग्न आटोपल्यानंतर एका दुचाकीवरून चौघे जण मारडा येथून कारला गावाकडे परत येत होते. कुऱ्हा ते कौंडण्यपूर मार्गावरील वळणावर चौफुलीसमोर विरूद्ध दिशेने येणारी दुचाकी वेगात असल्याने त्यांची समोरासमोर धडक झाली. दोन्ही दुचाकींचा वेग अधिक होता. शिवाय दुचाकीवर चौघे असल्याने त्यांना वळणावर वेग कमी करता आला नाही. त्यामुळे दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडकल्या. 

प्रवीण आडे, त्यांच्या आई व दोन लहान मुले असे चौघे एका दुचाकीवर, तर दुसऱ्या दुचाकीवर पुरूषोत्तम गांधी होते. पाचही जखमींना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पुरूषोत्तम गांधी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर गंभीर जखमी प्रवीण आडे यांना पुढील उपचारासाठी पीडीएमसी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान प्रवीण आडे यांचाही दुपारी मूत्यू झाला, असे गाडगेनगर पोलिसांनी सांगितले. समोरासमोर अपघात झाल्याची माहिती कुऱ्हा पोलिसांना दुपारी दोनच्या सुमारास समजली. परंतु तक्रार नसल्यामुळे गुन्हा दाखल झाला नसल्याचे कुऱ्ह्याचे ठाणेदार संदीप बिरांजे यांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूbikeबाईक